शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाकडून सांगावा मिळताच किशोर देशपांडे भाजपाच्या प्रचारात सक्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 10:42 IST

भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रिय.

ठळक मुद्देगेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रियराष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठाच्या सांगाव्यानंतर आणि काही नगरसेवकाच्या आग्रहानंतर किशोर देशपांडे यांचे पुनरागमन झाल्याची चर्चा

राकेश कदम 

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून अज्ञातवासात असलेले भाजपाचे जुने-जाणते निवडणूक  प्रमुख किशोर देशपांडे रविवारपासून पुन्हा भाजपाच्या प्रचारात सक्रिय झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठाच्या सांगाव्यानंतर आणि काही नगरसेवकाच्या आग्रहानंतर किशोर देशपांडे यांचे पुनरागमन झाल्याची चर्चा दिवसभर भाजपा वर्तुळातून ऐकायला मिळाली. 

भाजपाच्या कार्यकर्त्यांची पूर्वतयारीची बैठक रविवारी शांतीसागर मंगल कार्यालयात झाली. या बैठकीला प्रमुख नेत्यांसोबत किशोर देशपांडे उपस्थित होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्यात खटके उडाले होते. त्याची जगजाहीर चर्चाही झाली. त्यानंतर देशपांडे यांचे इतर काही नगरसेवकांशी बिनसले. त्यातून देशपांडे पक्षसंघटनेपासून बाजूला झाल्याचे भाजपाचे कार्यकर्ते सांगायचे. निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर ही बाब संघ परिवारातील सदस्य आणि माजी नगरसेवकांच्या लक्षात  आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नगरसेवकांनी संघ परिवारातील मंडळींच्या कानावर ही बाब घातली. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपात प्रवेश देतोय. पण आपलाच संघटक पक्षापासून दूर आहे. ही कुजबूज वाढल्यानंतर पक्षाकडून विचारणा झाली. अखेर देशपांडे यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मी अनेक दिवस पक्षाच्या कामांपासून दूर होतो, हे खरे आहे. मी १९८० पासून सोलापूर  लोकसभा मतदारसंघात भाजपाचा निवडणूकप्रमुख म्हणून काम पाहतोय. त्यानंतर अगदी २०१४ पर्यंत मी पाहिले. आमच्यासाठी सुभाष देशमुख यांची २००४ मध्ये झालेली निवडणूक वेगळी होती. या निवडणुकीच्या व्यवस्थापनात जरा जास्त कष्ट घ्यावे लागले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी निरोप दिल्याने मी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला. - किशोर देशपांडे, निवडणूक प्रमुख, भाजपा

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख