किसान रेल्वेमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:22 IST2020-12-29T04:22:22+5:302020-12-29T04:22:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी किसान रेल साप्ताहिक होती; परंतु आता ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. ...

किसान रेल्वेमुळे छोट्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पूर्वी किसान रेल साप्ताहिक होती; परंतु आता ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. अगदी थोड्या वेळात १००वी किसान रेल्वे चालवल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याचे स्पष्ट झाले.
मागणी तेथे पुरवठा होत असल्याने फायदा
टोमॅटोची किंमत फारच कमी झाल्यावर शेतकरी अस्वस्थ होतो. शेतकरी आपले कष्ट डोळ्यांसमोर उधळलेले पाहतो. किसान रेल्वेच्या सोयीनंतर त्याला एक पर्याय मिळाला आहे आणि देशातील ज्या भागात टोमॅटोची मागणी जास्त आहे आणि जेथे त्याला चांगली किंमत मिळू शकते अशा ठिकाणी त्याचे उत्पादन वाढवता येते. फळे आणि भाज्यांच्या वाहतुकीचा फायदा घेऊ शकतात. किसान रेल्वे ही चालू असलेले कोल्ड स्टोरेज आहे. यामध्ये फळे, दूध, भाज्या, मासे, मांस संपूर्ण सुरक्षेसह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत आहेत. डाळिंब, संत्री, द्राक्षे अशी उत्पादने या ट्रेनमधून पाठविली आहेत आणि ही ट्रेन सुमारे ४० तासांत शालिमारला पोहोचेल. सरकार किसान रेल्वेवरही ५० टक्के सवलत देत असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो
२८सांगोला०१
ओळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगोला स्थानकावरून १००व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी रेल्वेचे अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, शेतकरी उपस्थित होते.