संगदरीच्या सरपंचपदी किरण राजगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:16+5:302021-02-25T04:28:16+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावच्या सरपंचपदी किरण सुधाकर राजगुरू यांची तर उपसरपंचपदी पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील यांची बिनविरोध निवड ...

Kiran Rajguru as the Sarpanch of Sangdari | संगदरीच्या सरपंचपदी किरण राजगुरू

संगदरीच्या सरपंचपदी किरण राजगुरू

googlenewsNext

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी गावच्या सरपंचपदी किरण सुधाकर राजगुरू यांची तर उपसरपंचपदी पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

सन २०२१-२६ या वर्षासाठीच्या सार्वत्रिक निवडणुकीत संगदरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात गावच्या पंच कमिटीला यश आले आहे. माजी सरपंच पंडीत अंबारे, बसप्पा तुनतुने, श्रीशैल अंबारे, मारुती बिराजदार, शंकर रगबले, संजय शिवशेट्टी, प्रकाश उपासे, श्रीशैल हदरे, राजकुमार सौदागरे, इरेशा अंबारे, पवन सौदागरे, बाबुराव कोळी, शाबुद्दीन जमादार, ताजुदिन पठाण, राजकुमार घंटे, अमोल सौदागरे यांनी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

नव्याने उपसरपंच झालेले पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील हे उच्चशिक्षित आहेत. लहान वयात त्यांची राजकीय वाटचाल वाखाण्याजोगी आहे. सरपंचपद राखीव असल्याने उपसरपंच निवडीची तालुक्यात चर्चा होती. निवडीनंतर नव्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह नवे सदस्य राणी सौदागरे, संगव्वा रगबले, जगदेवी कारभारी, इस्माईल मुल्ला, मल्लिनाथ हदरे, महादेव अंबारे यांचा पंच कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला.‌

----

२४ किरण राजगुरू

२४ पद्मसिंह शिवशेट्टी-पाटील

Web Title: Kiran Rajguru as the Sarpanch of Sangdari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.