शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अशीही जयंती... जिजाऊंच्या लेकीच्या हाती, 1000 कुटुंबांत पोहोचवले राजे शिवछत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 16:34 IST

शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला

शहाजी फुरडे-पाटील

सोलापूर/बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. बार्शीत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. घरात कुटुंबासह शिवजन्मोत्सव साजरा करता यावा यासाठी चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ आणि त्यांच्या कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक हजार मूर्ती तयार केल्या. मूर्तीची घरातही प्रतिष्ठापना करता यावी म्हणून हळदी कुंकवासह सुवासिनींच्या हाती सोपविल्या. छत्रपतींच्या स्वागतासाठी जिजाऊंच्या लेकी पुढे सरसावल्या आहेत.

शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे फफाळ कुटुंबातील पांडुरंग यांच्यासह त्यांची आई कमल साहेबराव फफाळ, पत्नी उज्ज्वला, मुले आर्या, अविरत तसेच भाचे सिद्धी व समर्थ उघडे यांनी स्वत: रात्रंदिवस जागून महाराजांच्या या मूर्ती बनविल्या. कोणतेही शुल्क न घेता केवळ छत्रपतींचा विचार, आचार घराघरात पोहोचावा या उदात्त हेतुने फफाळ कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे. शहराच्या विविध भागांतील महिलांच्या हाती या मूर्ती सुपूर्द केल्या.

महाराजांच्या विचारांतून प्रेरणा...

शिवजन्मोत्सव साजरा करताना तो घरातील प्रत्येकाला साजरा करता यावा, विशेष करून महिलांनी घरातही मूर्तीची प्रतिष्ठापना करावी हा विचार मनात आला. हा विचार पत्नीला, आईला बोलून दाखविला. घरातील सर्वांनीच याला होकार दिलाच, तसेच आम्ही स्वत: या मूर्ती तयार करू, असा नवा विचारही मांडला. यानंतर एक हजार मूर्ती तयार करण्यात आल्या.  सर्व मित्रांनीही याचे कौतुक करत आणखी प्रोत्साहन दिले. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प तयार करत असताना त्यांचा इतिहास वाचत होतो. यातूनच मला या उपक्रमाची प्रेरणा मिळाली.पाडूरंग फफाळ, चित्रशिल्पकार, बार्शी 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीSolapurसोलापूर