करमाळ्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:27 IST2021-09-15T04:27:26+5:302021-09-15T04:27:26+5:30

करमाळा : तालुक्यात एका गावात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा ...

Kidnapped a minor girl from Karmala | करमाळ्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

करमाळ्यातून अल्पवयीन मुलीला पळविले

करमाळा : तालुक्यात एका गावात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आजोबानी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादी आजोबा हे पत्नी, मुलगा व १७ वर्षांची एक व दुसरी १५ वर्षांची नात असे एकत्रित राहतात. गावच्या शिवारात त्यांची शेती आहे. घरातील लोक शेतात गेल्यावर १७ वर्षांची नात गावातच राहणाऱ्या मुलीकडे नेहमी जात असे. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नात घरामध्ये कुठेही दिसत नसल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर गावामध्ये मुलीच्या घरी नात सकाळी आली होती. त्यानंतर काही वेळाने घरामध्ये व शेजारी चौकशी केली तेव्हा ती दिसून आली नाही. त्यानंतर टेंभुर्णी, इंदापूर व जेऊर येथेही शोध घेतला. तिला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद दिली.

Web Title: Kidnapped a minor girl from Karmala