खो-याच्या दांडक्याने जवळ्यात दांपत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST2021-02-12T04:21:26+5:302021-02-12T04:21:26+5:30

सांगोला : शेतात पोखरला दंड बुजवण्याच्या कारणावरुन एका दांपत्याला पोलीस कर्मचारी आणि मुलाने खो-यांच्या दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार जवळा ...

Kho-ya beat the couple nearby with a stick | खो-याच्या दांडक्याने जवळ्यात दांपत्याला मारहाण

खो-याच्या दांडक्याने जवळ्यात दांपत्याला मारहाण

सांगोला : शेतात पोखरला दंड बुजवण्याच्या कारणावरुन एका दांपत्याला पोलीस कर्मचारी आणि मुलाने खो-यांच्या दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार जवळा (ता. सांगोला) येथे घडला. या मारहाणीत पत्नीचा डावा हात फॅक्चर झाला आहे.

शिवाजी शंकर साळुंखे व विश्रांती शिवाजी साळुंखे असे जखमी दांपत्याचे नाव असून बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

जखमी शिवाजी साळुंखे व पोलीस कॉन्स्टेबल विलास यशवंत घाडगे हे एकमेकाशेजारी राहतात.

सकाळी शिवाजी साळुंखे हे घरासमोर थांबले असता विलास घाडगे आणि मुलगा अनिकेत घाडगे हे दोघेजण आले. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर येऊन शिवाजी साळुंखे यास बोलावून घेतले. तुम्ही शेतातील दंड का पोखरला, आमची जमीन खराब होते. मी हा दंड बुजवून घेतो असे म्हणत भांडण काढले. त्यानंतर खो-याने पाठीत मारले. तसेच या पिता-पुत्राने मारहाण केली. पतीला सोडवायला आलेल्या पत्नी विश्रांती यांनाही त्याच खो-याने तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारले. नदीजवळ मासे धरण्यासाठी आलेले संतोष साळुंखे , राम राम घाडगे ,राहुल अलकुंटे ,समाधान सुरवसे यांनी हे भांडण सोडवले. याबाबत शिवाजी साळुंखे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Kho-ya beat the couple nearby with a stick