केवड परिसर केला निर्जतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:45+5:302021-05-10T04:21:45+5:30

माढा : केवड येथे गंधर्व ऑईल इंडस्ट्रीज यांच्यावतीने स्वखर्चातून गावातील सर्व रस्ते व परिसर निर्जंतुकीकरण करत सामाजिक बांधीलकी जपली. ...

Kevad premises dehydrated | केवड परिसर केला निर्जतुकीकरण

केवड परिसर केला निर्जतुकीकरण

माढा : केवड येथे गंधर्व ऑईल इंडस्ट्रीज यांच्यावतीने स्वखर्चातून गावातील सर्व रस्ते व परिसर निर्जंतुकीकरण करत सामाजिक बांधीलकी जपली. रविवारी सकाळी केवडमध्ये सर्व रस्ते व खुला परिसर यांचे निर्जंतुकीकरण करत सामाजिक बांधीलकी जपली आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने केवड आश्रमशाळेचे अध्यक्ष महारुद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळेस राजाभाऊ पाटील, सुनील धर्मे, पोलीस पाटील सज्जन पाटील, गणेश चव्हाण, दत्तात्रय लटके, कालिदास चव्हाण, शंकर पाटील, पिंकेश लटके, समाधान लटके, नीलेश लटके उपस्थित होते.समाधान सोमनाथ सरवदे, नीलेश पठाडे यांनी परिश्रम घेतले.

---

०९ माढा

गंधर्व ऑईल इंडस्ट्रीज यांच्या वतीने केवड येथे स्वखर्चातून निर्जंतुकीकरण करण्यात आले.

Web Title: Kevad premises dehydrated