शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिवजयंतीदिनी सोलापुरात जन्मणाºया बाळांना देणार पाळणे; शिवबा-जिजाऊंचे नाव देण्याची करणार विनंती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 14:05 IST

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजून १ मिनिटापर्यंत ते १९ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ...

ठळक मुद्देमहापालिकेतील जगदंब ग्रुपचा अनोखा उपक्रम; ३०० कर्मचारी देणार योगदान शिवजयंतीदिनी जन्मणाºया बाळांना बाटलीसह दूधही देण्यात येणार उपक्रमातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश

रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजून १ मिनिटापर्यंत ते १९ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत म्हणजेच शिवजयंतीदिनी  जन्मणाºया नवजात शिशूंच्या माता-पित्यांचा त्याच दिवशी सन्मान अन् त्यानंतर शिशूंसाठी पाळणे देऊन राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांनी स्थापन केलेला जगदंब ग्रुप सरसावला आहे. ‘बदलतं सोलापूर-बदलता उत्सव’ सोहळ्यात सहभागी ३०० कर्मचारी (अधिकाºयांसह) आपल्या स्वखर्चातून हा उपक्रम यशस्वी करणार असून, मुलगा जन्मला तर शिवबा अन् मुलगी जन्मली तर जिजाऊंचे नाव देण्याची विनंतीही ग्रुपचे सदस्य करणार आहेत. 

‘लोकमत’ च्या ‘शिवजन्मोत्सवाची तयारी... थाट सोलापुरी’चा प्रभाव जगदंब ग्रुपच्या सदस्यांवर पडला. रविवारी सकाळी ग्रुपचे काही सदस्य एकत्र येऊन अभिवादनाचा हा अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. दाराशा हॉस्पिटल, भावनाऋषी, रामवाडी, डफरीन (अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह), मदर तेरेसा, चाकोते प्रसूतिगृह (जोडभावी पेठ), बॉईज मॅटर्निटी (कन्ना चौक) या महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्येच जन्मणाºया नवजात शिशूंचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या माता-पित्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवजयंतीदिनी जन्मणाºया बाळांना बाटलीसह दूधही देण्यात येणार आहे.

जगदंब ग्रुपच्या शिवजयंतीचे यंदा केवळ दुसरेच वर्ष आहे. गणेश डेंगळे, मेघराज साळुंके, भारत गायकवाड, के. बी. माने, दीपक भोसले, राजू पवार, नागेश बंदपट्टे, अनंत थोरात, प्रभूलिंग पुजारी, आदिनाथ जाधव, राजेश पवार आदी अधिकारी, कर्मचारी यंदाच्या शिवजयंती सोहळ्यातील हा आगळा-वेगळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवजयंतीसाठी इथे ना पदाधिकारी, ना कार्यकारिणी... सगळेच पदाधिकाºयांच्या भूमिकेत वावरत असतात. अंगात केसरी (भगवा) रंगाचा शर्ट आणि पांढºया रंगाची पॅन्ट या पोषाखात ग्रुपचे कार्यकर्ते मध्यवर्तीच्या मिरवणुकीत सहभागी होताना छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.

उपक्रमातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा संदेश४मुलाने जन्म घेतला तर आनंद अन् मुलीने जन्म घेतला तर आनंदावर विरजण... असा काहीसा प्रसंग ज्या-त्या संबंधित कुटुंबावर येतो. ‘मुलगा काय-मुलगी काय- दोघे सारखेच’ हा संदेश जगदंब ग्रुपच्या माध्यमातून शिवजयंतीदिनी देण्याची संधी मिळणार असल्याचे गणेश डेंगळे, नागेश बंदपट्टे, आदिनाथ जाधव, राजेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

‘लोकमत’च्या ‘शिवजन्मोत्सवाची तयारी... थाट सोलापुरी’या संकल्पनेस साजेसा उपक्रम हाती घेण्याचा योग आला. मुलगा जन्मला तर शिवबा अन् मुलगी जन्मली तर जिजाऊंचे नाव देण्याची विनंती आम्ही करणार आहोत.- गणेश डेंगळे

शिवजयंतीचा उत्सव इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. याचा अधिक आनंद आहे. शिवबा अथवा जिजाऊंचे नाव देण्याच्या आवाहनातून मुलगा-मुलगीतील भेद नक्कीच कमी होईल. एक चांगला संदेश जाईल.- नागेश बंदपट्टे

ज्या छत्रपतींनी सर्वच जाती-धर्मांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्या छत्रपतींचे विचार घराघरापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम आहे. जगदंब ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमातून छत्रपती शिवाजी राजेंना अभिवादन करु.- आदिनाथ जाधव

राजा शिवछत्रपतींच्या राज्यात स्त्री-पुरुष समानता होती. कुठलाच भेदभाव नव्हता. तोच विचार घेऊन जगदंब ग्रुपने हाती घेतलेल्या या उपक्रमांतून शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर, जागरण होणार आहे, याचा आनंद आहे.- राजेश पवार 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंती