स्वतंत्र व्यवस्था असेल तरच होम आयसोलेशनमध्ये ठेवा; चाचण्यांवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:23+5:302021-08-21T04:26:23+5:30
पंढरपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत शासकीय विश्रामगृह बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी ...

स्वतंत्र व्यवस्था असेल तरच होम आयसोलेशनमध्ये ठेवा; चाचण्यांवर भर द्या
पंढरपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत शासकीय विश्रामगृह बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद गिराम आदी उपस्थित होते.
रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णांसोबत एकच नातेवाईक राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे त्यांचीही दर तीन दिवसांनी कोरोना चाचणी करावी. रुग्णांना रुग्णालयातच औषधे उपलब्ध होतील, अशी व्यवस्था रुग्णालयांनी करावी, संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पंढरपूर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये २८६ रुग्ण असून, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये १९७ रुग्ण उपचार घेत आहेत, तर जिल्ह्यातील ५४ रुग्ण उपचार घेत आहेत. होमआयसोलेशनमध्ये १९२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
चाचण्यांची संख्या वाढवा
पंढरपूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करावी. जेणेकरून वेळेत रुग्णांचे निदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करता येईल. बाधित रुग्णांपासून होणारा संसर्ग रोखण्यासाठी शहर व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवा, असेही अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सांगितले.
चाचण्यांसाठी नागरिकांनी पुढे यावे
पंढरपूर तालुक्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळीच संसर्ग रोखणे आणि वेळेत उपचार घेणे शक्य होईल. कोरोना चाचण्यासाठी पुढे येण्याच्या दृष्टीने ग्रामस्तरीय समिती व लोकप्रतिनिधी यांनी आवाहन करावे, असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.