कर्नाटकचा अरविंद शास्त्री प्रथम
By Admin | Updated: December 30, 2014 23:38 IST2014-12-29T23:14:00+5:302014-12-30T23:38:07+5:30
सांगलीचा कठमाळे उपविजेता: सुरेश जोशी उत्कृष्ट वयोवृध्द खेळाडू

कर्नाटकचा अरविंद शास्त्री प्रथम
सांगली : कर्नाटकच्या अरविंद शास्त्रीने अंतिम फेरीत कोणताही धोका न पत्कारता साडेसात गुणांसह डाव बरोबरीत सोडवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळेला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नूतन बुध्दिबळ मंडळ व सूरज स्पोर्टस् अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाडमध्ये सूरज आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुध्दीबळ स्पर्धा पार पडल्या.
पारितोषीक वितरण विक्रीकर उपायुक्त एस. बी. कानगुडे, प्रदीप वळसंग व एन. जी. कामत यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजाभाऊ शिरगावकर होते.
यावेळी चिंतामणी लिमये, चिदंबर कोटीभास्कर, गिरीष चितळे, प्राचार्य रमेश चराटे, विजय आपटे, कुमार माने, स्मिता केळकर, माधुरी आपटे उपस्थित होते.
पंच म्हणून नितीन शेणवी, दीपक वायचळ, विकास भावे, करण परीट यांनी काम पाहीले.
अंतिम निकाल असा : अरविंद शास्त्री (कर्नाटक), समीर कठमाळे (सांगली), चिन्मय कुलकर्णी (पुणे), हितेश जरीया (मध्य प्रदेश), शुभम कुमठेकर (मुंबई), शरण राव (कर्नाटक), सिध्दांत गायकवाड (पुणे), संकर्षा शेळके (अहमदनगर), अनिश गांधी (कोल्हापूर), अमेय आडी (गोवा). (क्रीडा प्रतिनिधी)