शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या कांदा उत्पादकांना अनुदान नाही : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 12:59 IST

सोलापूर :  राज्य सरकारने जाहीर केलेले कांद्यासाठीचे अनुदान फक्त महाराष्टÑातील शेतकºयांना मिळणार आहे. सोलापूरसह महाराष्टÑातील अनेक बाजार समितीमध्ये कांदा ...

ठळक मुद्दे सोलापूर बाजार समितीत वाहतुकीची अट शिथिलएका शेतकºयाच्या किमान २०० क्विंटलपर्यंतच्या कांद्याला हे अनुदान दिले जाणार कांदा अनुदान हे केवळ महाराष्टÑातील शेतकºयांसाठीच

सोलापूर:  राज्य सरकारने जाहीर केलेले कांद्यासाठीचे अनुदान फक्त महाराष्टÑातील शेतकºयांना मिळणार आहे. सोलापूरसह महाराष्टÑातील अनेक बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या कर्नाटक व अन्य राज्यातील शेतकºयांना हे अनुदान मिळणार नाही. दरम्यान, कांदा वाहतूक अनुदानासाठी किलोमीटरची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव पणन खात्याचा असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्टÑ सरकारने कांद्याचे दर घसरल्याने नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री झालेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील पणन खात्याच्या अधिकाºयांनी बाजार समित्यांमध्ये एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत झालेल्या कांदा विक्रीची आकडेवारी एकत्रित केली आहे.

या कालावधीत एका शेतकºयाच्या किमान २०० क्विंटलपर्यंतच्या कांद्याला हे अनुदान दिले जाणार आहे. सोलापूरसह राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये कर्नाटक व शेजारच्या अन्य राज्यातील कांदा विक्री झाला आहे. या शेतकºयांना मात्र हे अनुदान मिळणार नाही असे सहकार व पणन खात्याचे मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. यामुळे कांद्यासाठी दिली जाणारी रक्कम वाचणार आहे.

कांदा उत्पादन होणाºया राज्यातील कांदा वाहतूक करून दुसºया राज्यात घेऊन जाण्यासाठी केंद्र शासनाकडून वाहतूक अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतमाल सहकारी संस्था व शेतकरी गटाला पणन खात्याकडून हे वाहतूक अनुदान दिले जाते. सध्या हे अनुदान ७५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर वाहतूक करणाºया वाहनासाठी अनुदान दिले जाते; मात्र त्यापेक्षा कमी अंतर वाहतूक केली तरीही अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितले. 

कर्नाटकचाच बहुतांशी कांदा..एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत सोलापूर बाजार समितीमध्ये ४९,९०९ शेतकºयांचा ९ लाख ५४ हजार ९०५ क्विंटल कांदा विक्रीतून ६६ कोटी ७७ लाख रुपयाची उलाढाल झाली. यामध्ये कर्नाटकमधील बहुतांशी कांदा असल्याचे सांगण्यात आले. कांदा अनुदान हे केवळ महाराष्टÑातील शेतकºयांसाठीच असल्याने कर्नाटक व अन्य राज्यातील कांदा उत्पादकांची संख्या कमी होणार आहे. थेट बँक खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीonionकांदाKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र