करमाळ्याच्या हक्काचे पाणी कोणालाही घेऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:57+5:302021-04-29T04:16:57+5:30
उजनीची क्षमता ११७ टीएमसी आहे, त्यापैकी ६४ टीएमसी मृतसाठा व ५४ टीएमसी वापरातील पाणीसाठा. वापरातील पाणीसाठ्याचेच वाटप केले जाते, ...

करमाळ्याच्या हक्काचे पाणी कोणालाही घेऊ देणार नाही
उजनीची क्षमता ११७ टीएमसी आहे, त्यापैकी ६४ टीएमसी मृतसाठा व ५४ टीएमसी वापरातील पाणीसाठा. वापरातील पाणीसाठ्याचेच वाटप केले जाते, पण आतापर्यंत उजनीचे ५४ नाहीतर ८० टीएमसी पाण्याचे वाटप झालेले आहे. म्हणजेच मृतसाठ्यामधील पण काही पाण्याचे वाटप हे याआधी झाले आहे, त्यामुळे अतिरिक्त पाणीवाटपास आमचा विरोध आहे, असे बागल यांनी म्हटले आहे.
लवकरच आपण मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटून इंदापूरला देण्यात येणाऱ्या ५ टीएमसी पाण्याच्या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी मागणी करणार आहे, असे बागल यांनी स्पष्ट केले.
---
करमाळ्याच्या हक्काचे पाणी कोणालाही घेऊ देणार नाही, संपूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना, सांडपाण्याच्या नावाखाली पाणी नेण्याचा घाट घातला जातो आहे आणि जर वेळ आलीच तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ.
- दिग्विजय बागल
---