सुस्तेच्या सरपंचपदी कांताबाई रणदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:21 IST2021-03-06T04:21:48+5:302021-03-06T04:21:48+5:30

सरपंचपदासाठी विठ्ठल-भीमा परिवारातून कांताबाई रणदिवे व घाडगे गटातून विशाल कसबे यांनी तर उपसरपंचपदासाठी विठ्ठल-भीमा परिवारातून तुषार चव्हाण व घाडगे ...

Kantabai Ranadive as the Sarpanch of Susta | सुस्तेच्या सरपंचपदी कांताबाई रणदिवे

सुस्तेच्या सरपंचपदी कांताबाई रणदिवे

सरपंचपदासाठी विठ्ठल-भीमा परिवारातून कांताबाई रणदिवे व घाडगे गटातून विशाल कसबे यांनी तर उपसरपंचपदासाठी विठ्ठल-भीमा परिवारातून तुषार चव्हाण व घाडगे गटातून दत्तात्रय बोबडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. घाडगे गटाचे विशाल कसबे व दत्तात्रय बोबडे यांनी अर्ज माघारी घेतल्याने विठ्ठल-भीमा परिवाराचे सरपंचपदी कांताबाई रणदिवे, उपसरपंचपदी तुषार चव्हाण यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी एम. एल. देवकते यांनी जाहीर केली आहे. त्यांना ग्रामविकास आधिकारी विष्णू गवळी सहकार्य केले.

यावेळी विठ्ठलचे माजी संचालक रामदास चव्हाण, तानाजी चव्हाण, माधव चव्हाण, तात्यासाहेब नागटिळक, सप्तशृंगी पतसंस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, धनाजी सालविठ्ठल, वसंत घाडगे, पांडुरंग कदम, धनाजी घाडगे, गणेश बोबडे, संतोष सुळे, गणेश चव्हाण, सतीश चव्हाण, रमेश रोकडे, संभाजी चव्हाण, मुकुंद चव्हाण, जीवन रणदिवे, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, सुनील रणदिवे, दत्तात्रय वायदंडे उपस्थित होते.

फोटो

०५सुस्ते-कांताबाई रणदिवे

०५सुस्ते-तुषार चव्हाण

Web Title: Kantabai Ranadive as the Sarpanch of Susta