शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणरावांनी विचारले, भाजपमध्ये जायचं का ? कार्यकर्त्यांनी हात उंचावून दिला प्रवेशासाठी होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:26 IST

श्रीराम मंगल कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

ठळक मुद्देलवकरच वाडीकुरोली येथे मेळावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे कल्याणराव काळे यांनी जाहीर केले.२५ मार्च रोजी अचानक मुख्यमंत्र्यांचा फोन आला, चेअरमन भेटायला या, त्यानंतर त्यांची मुंबईत भेट घेतली - कल्याणराव काळे

पंढरपूर : सर्व कार्यकर्ते व पदाधिकाºयांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याणराव काळे बोलण्यास उभारले़ त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जायचे का? असा सवाल उपस्थित करताच सर्व कार्यकर्त्यांनी हात उंचावून ‘हो’ असा होकार दिला.

येथील श्रीराम मंगल कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या पार्श्वभूमीवर काळे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी कल्याणराव काळे यांनी गत आठवडाभरात झालेल्या घटना-घडामोडी कार्यकर्त्यांना सांगताना म्हणाले, २५ मार्च रोजी अचानक मुख्यमंत्र्यांचा फोन आला, चेअरमन भेटायला या, त्यानंतर त्यांची मुंबईत भेट घेतली. भाजप प्रवेशाला काही अडचण आहे का? असा सवाल करून अडचणीत आलेल्या संस्थांना मदत तसेच शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवितो, असे सांगून आज आपल्याशी चर्चा केली. त्यामुळे लवकरच वाडीकुरोली येथे मेळावा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे कल्याणराव काळे यांनी जाहीर केले.

यावेळी नारायण मोरे, राजेंद्र शिंदे, महादेव देठे, समाधान काळे, गणेश ठिगळे, नागेश फाटे, दिनकर चव्हाण, सुधाकर कवडे, डॉ. सुधीर शिनगारे, विश्रांती भुसनर यांच्यासह विविध संस्थांचे संचालक, काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील