सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले

By Appasaheb.patil | Published: March 1, 2023 04:44 PM2023-03-01T16:44:01+5:302023-03-01T16:47:48+5:30

कोणीही किती आरोप करू द्या, न्यायालयात जावू द्या आम्ही तयार आहोत, असं म्हणत असताना देवस्थानच्या आजपर्यंत वाटचालीबाबत बोलताना देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी भावूक झाले.

Kadadi says politics are taking place in Solapur's Siddheshwar temple | सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले

सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले

googlenewsNext


सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर मंदिरात अलीकडच्या काळात अधिकच राजकारण होत आहे. काही मंडळीं देवस्थानला बदनाम करण्याचा डाव आखत आहे. देवस्थानचे काम पूर्णपणे प्रामाणिक अन् चोख आहे. कोणीही किती आरोप करू द्या, न्यायालयात जावू द्या आम्ही तयार आहोत, असं म्हणत असताना देवस्थानच्या आजपर्यंत वाटचालीबाबत बोलताना देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी भावूक झाले.
 
दरम्यान, नुकतेच माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत देवस्थानविषयी केलेले सर्व आरोप काडादींनी फेटाळले. यात्राकाळात दारूकामाच्या आतषबाजी कार्यक्रमावेळी जगदीश पाटील यांनी देवस्थानविषयी चुकीचे शब्द वापरले, त्यावेळी काडादी व जगदीश पाटील यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्या वादानंतर संतप्त झालेल्या जगदीश पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मंदिरावर प्रशासक आणणार असल्याचे स्पष्ट केले, त्यासाठी कोर्टात जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी पाटील यांनी काही पुरावेही पत्रकारांना दाखविले. त्याला उत्तर देण्यासाठी बुधवारी मंदिर समितीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
 

Web Title: Kadadi says politics are taking place in Solapur's Siddheshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.