ज्योती क्रांतीचे तालुकाध्यक्ष बलभीम भानवसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:16+5:302021-03-24T04:20:16+5:30
अनगर : ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ...

ज्योती क्रांतीचे तालुकाध्यक्ष बलभीम भानवसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
अनगर : ज्योती क्रांती परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते बलभीम भानवसे आणि कार्याध्यक्ष संतोष भानवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार राजन पाटील व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला.
अनगर ग्रामसचिवालयामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. राजन पाटील आणि पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना बलभीम भानवसे म्हणाले, मोहोळ तालुक्याच्या विकासात लोकनेते परिवाराचे मोलाचे योगदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून यापुढे राजकारणात कार्यरत राहू. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विकास कोकाटे, सौंदणेचे उपसरपंच सचिन भानवसे, वसंत माळी, विकास माने, शकील पठाण, दत्तात्रय गोडसे, संतोष गोडसे, पांडुरंग भानवसे, उमाजी पाटील, दिगंबर बनसोडे उपस्थित होते.
---
२३ अनगर
बलभीम भानवसे आणि संतोष भानवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार राजन पाटील आणि अजिंक्यराणा पाटील