आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 02:17 IST2015-07-06T02:17:39+5:302015-07-06T02:17:39+5:30
पोलीस ठाण्यावर दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ५७ जणांना मोहोळच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी
मोहोळ : पोलीस ठाण्यावर दगडफेक व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यासह ५७ जणांना मोहोळच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आ. कदम यांच्या अटकनाट्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शनिवारी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती.
शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या हायवे पुलाखाली वाहतुकीस अडथळा ठरणारी लोखंडी जाळी आ़ कदम यांनी २८ जून रोजी जेसीबीच्या सहाय्याने काढली होती़ त्याबद्दल त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे सांगत, आ़ कदम यांनी शनिवारी या गुन्ह्यात अटक करवून घेण्यासाठी मोर्चा काढला़ यावेळी दगडफेकीत १२ पोलीस जखमी झाले़ शिवाय ४ पोलीस गाड्याच्याही काचा फोडण्यात आल्या़ (वार्ताहर)