शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

खुसखुशीत समोशाची लज्जत न्यारी, रमजान महिन्यात अधिकच प्यारी !

By appasaheb.patil | Updated: May 17, 2019 12:34 IST

सोलापुरात दररोज होते सव्वा लाखाची उलाढाल; बाजारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चलती

ठळक मुद्देयंदा बाजारात रमजाननिमित्त समोशाबरोबरच दाळ वडे, पकोडा भजी, व्हेज व नॉनव्हेज समोशाला जास्तीची मागणीसाधारणपणे शहरात रमजान काळात दिवसाला एक ते सव्वा लाखापर्यंत उलाढाल या खाद्यपदार्थांमधून होते़मागील वर्षीपेक्षा यंदा समोशाचे दर ५ ते १० टक्के वाढलेले आहेत

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : रमजान महिन्यामध्ये करण्यात येणाºया पवित्र रोजा उपवासाला मुस्लीम समाजामध्ये विशेष महत्त्व मानलं जातं.  या महिन्यात उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव खजुरासह खाद्यपदार्थांचा वापर करतात़ याबरोबरच समोशासह दाळ वडे, चिकन समोसा, खवा समोसा, पकोडा भजी, पालक भजी, पॅटीस या खाद्यपदार्थांची खरेदी करतात़ रमजान महिन्यात दिवसाला सव्वा लाखाची उलाढाल होते अशी माहिती पुढे आली आहे़ या उलाढालीवरुन ‘समोशाची लज्जत न्यारी, रमजान महिन्यात ती अधिकची प्यारी’ असं काहीसं चित्र सर्वत्र पाहायला मिळू लागलं आहे. 

दिवसभर उपवास करणारे बांधव नमाज पठण, इफ्तारनंतर खुसखुशीत समोशाचा आस्वाद घेत असल्याची माहिती होलसेल व्यापारी अकबरभाई फुलारी व अमर फारूख फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

रमजान महिन्याला प्रारंभ झाला आहे़ रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी विविध खाद्यपदार्थ बाजारात विक्रीला आले आहेत़ विजापूर वेस, बाराईमाम चौक, शास्त्रीनगर, विजापूर रोड, नई जिंदगी परिसर, कुमठा नाका आदी परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत़ खाद्यपदार्थ खरेदीसाठी सर्वाधिक गर्दी विजापूर वेसमध्ये होत आहे़ इफ्तारसाठी वापरण्यात येणाºया खाद्यपदार्थांविषयी माहिती देताना अकबरभाई फुलारी यांनी सांगितले की, सोलापूर शहरात रमजानच्या इफ्तारनिमित्त दररोज सायंकाळी ४ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत समोसा, पालक भजी, बटाटा भजी, मिरची भजी, दाळ वडे, चिकन ६५, पकोडा भजी, चना वटाणा, व्हेज व नॉनव्हेज भजी आदी प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीला आले आहेत.

अडीचशे स्टॉलवर मिळतात खाद्यपदार्य- रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी खाल्ल्या जाणाºया खाद्यपदार्थांचे शहरातील विविध भागात ८० ते १०० लहान-मोठे स्टॉल्स आहेत.यात काही होलसेल तर काही किरकोळ विक्रेते आहेत़ शिवाय बेकरी दुकानातून खरेदी करणारे बांधव वेगळेच आहेत़ अशा जवळपास २५० स्टॉलवर खाद्यपदार्थ मिळतात.  दुपारी चारनंतर या स्टॉलवर खाद्यपदार्थांच्या विक्रीला प्रारंभ होतो़ इफ्तार म्हणजे सायंकाळी सहाच्या सुमारास स्टॉलवर समोसा खरेदीसाठी मोठी गर्दी पडते़ मुस्लीम बांधवांसह इतर विविध समाजातील बांधव प्रामुख्याने समोसा, पकोडा, दाळ वडे, पॅटीसची खरेदी करतो़

असे आहेत प्रकार अन् दर

  • - साधा समोसा - ४० रुपये डझन 
  • - कांदा समोसा - ५० रुपये डझन
  • - खिमा समोसा - ६० रुपये डझन
  • - चिकन समोसा - ९० रुपये डझन
  • - खवा समोसा - १२० डझन
  •  

खजुराची मागणी वाढली...- इस्लाम धर्मात आत्यंतिक महत्त्व असलेल्या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली आहे. रोजा (उपवास) सोडताना मुस्लीम बांधव खजुराचे आवर्जून सेवन करतात. अनेक प्रकारचे खजूर बाजारात असले तरी मस्कती खजुराची विक्री जोरात आहे. शहरात चार देशांमधून खजूर विक्रीसाठी येत आहे. रमजानमध्ये महिनाभर उपवास केले जातात. या काळात हलका आहार हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. त्यादृष्टीने बाजारपेठेत विविध प्रकार उपलब्ध आहेत. यासोबत समोसा पट्टी, खिचडा आणि नॉनव्हेजचे खास मसालेदेखील बाजारात आले आहेत. खजुरात सीडलेस खजुरापेक्षा सीडयुक्त खजुराला खूप मागणी असून, यातही अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

यंदा बाजारात रमजाननिमित्त समोशाबरोबरच दाळ वडे, पकोडा भजी, व्हेज व नॉनव्हेज समोशाला जास्तीची मागणी आहे़ साधारणपणे शहरात रमजान काळात दिवसाला एक ते सव्वा लाखापर्यंत उलाढाल या खाद्यपदार्थांमधून होते़ मागील वर्षीपेक्षा यंदा समोशाचे दर ५ ते १० टक्के वाढलेले आहेत़ विजापूर वेस परिसरात २५ ते ३० होलसेल व किरकोळ विक्रेते आहेत़ - उमर फारूख फुलारी, होलसेल विक्रेते, विजापूर वेस.

रमजान महिन्यात मागील वर्षीपेक्षा यंदा समोसा खरेदीला गर्दी कमी प्रमाणात दिसून येत आहे़ शहराचा विस्तार वाढला, त्यामुळे ठिकठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल, दुकान, शॉपची निर्मिती झाली़ त्यामुळे मुस्लीम बांधव आपल्या नजीकच्या स्टॉलवरून समोसा व इतर खाद्यपदार्थांची खरेदी करून मशिदीत रोजा सोडतात़ मागील वर्षीपेक्षा यावर्षी उलाढालीत वाढ होईल़अकबरभाई फुलारी,होलसेल विक्रेते, सोलापूऱ

टॅग्स :SolapurसोलापूरRamadanरमजानMarketबाजार