गोपीनाथ मुंडेंची देवदर्शनासाठी सफर
By Admin | Updated: May 9, 2014 23:59 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T23:59:24+5:30
रविवारी सोलापुरात मुक्काम; खासगी हेलिकॉप्टरने प्रवास

गोपीनाथ मुंडेंची देवदर्शनासाठी सफर
रविवारी सोलापुरात मुक्काम; खासगी हेलिकॉप्टरने प्रवास
सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपा उपनेते गोपीनाथ मुंडे देवदर्शनाला निघाले असून, रविवारी व सोमवारी खासगी हेलिकॉप्टरने विविध देवांचे दर्शन घेणार आहेत.
बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार असलेले गोपनाथ मुंडे केंद्रात स्थायी समिती रसायनचे अध्यक्ष आहेत. त्यांचा दौरा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे. रविवारी सकाळी ८ वाजता ते खासगी हेलिकॉप्टरने मुंबईहून निघणार असून ते प्रथम शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरनेच शिंगणापूर येथे श्रीक्षेत्र शनिदेवाच्या दर्शनाला जाणार आहेत. त्यानंतर ते तुळजापूर येथे श्रीक्षेत्र तुळजाभवानीचे दर्शन घेऊन हेलिकॉप्टरने सोलापूरला येणार आहेत. सोलापुरात मुक्काम करुन ते सकाळी हेलिकॉप्टरने गाणगापूर येथे श्रीक्षेत्र दत्ताचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते पंढरपूरच्या विठोबारायाचे दर्शन घेऊन मुंबईला परतणार आहेत.