जीप उलटून पाच जण जखमी
By Admin | Updated: June 10, 2015 13:35 IST2015-06-10T13:30:36+5:302015-06-10T13:35:25+5:30
तुळजापूरहून पुण्याकडे निघालेली जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळनजीक आज (मंगळवारी) दुपारी २ वाजता हा अपघात घडला.

जीप उलटून पाच जण जखमी
सोलापूर : तुळजापूरहून पुण्याकडे निघालेली जीप उलटून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळनजीक आज (मंगळवारी) दुपारी २ वाजता हा अपघात घडला.
साधू सोपान हगवणे (वय ६५), अनुष्का दत्तात्रय हगवणे (वय ७, दोघे रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे), किरण मारुती तुपे (वय १४), सचिन लक्ष्मण कुरकुंडे (वय ३२), शोभा मारुती तुपे (वय ४0, तिघे रा. थेऊर फाटा, हडपसर, पुणे) अशी जखमींची नावे असून, त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)