रोडच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जीपची धडक ; पाच जागीच ठार ; ११ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST2021-02-13T04:22:24+5:302021-02-13T04:22:24+5:30

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जी. जे. ०३ डबल्यू ९३५५ या क्रमांकाचा ट्रक सांगोला रस्त्याकडे तोंड करून थांबला होता. ...

A jeep hitting a truck parked on the side of the road; Five killed on the spot; 11 injured | रोडच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जीपची धडक ; पाच जागीच ठार ; ११ जखमी

रोडच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जीपची धडक ; पाच जागीच ठार ; ११ जखमी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जी. जे. ०३ डबल्यू ९३५५ या क्रमांकाचा ट्रक सांगोला रस्त्याकडे तोंड करून थांबला होता. यावेळी संगोल्याकडून येणाऱ्या (के. ए. ०४ एम बी ९४७६) या क्रमांकाची जीप ट्रकवर आदळली. या अपघातात सखाराम धोंडिबा लांबोर (वय ५०), शारदाबाई लक्ष्मण लांबोर (वय ६२, रा. धनगरवाडी, धामणे, बेळगाव, कर्नाटक), पिंकी ऊर्फ सुनिता ज्ञानू लांबोर (वय ११), नागुबाई काळू लांबोर (वय ६५), तुकाराम खंडू कदम (वय ५०, सर्व रा. बाद्राई कडवळे, ता. चंदगड, कोल्हापूर ) यांचा जागीच मृत्यू झाला.

जखमींमध्ये धोंडिबा बापू लांबोर (वय ८७), कोडंदेवा बापू लांबोर (वय ७), कोमल बापू लांबोर (वय ७), बबन लांबोर (वय ४५), भारती बापू लांबोर (वय ५४), रोहन यशवंत कांबळे (वय २०), बापू कलप्पा लांबोर (वय ४५), काळूलाल लांबोर ( वय ७०), नागुबाई ग्यानू कोकरे (वय ५०), धोंडिबा सखाराम डोईफोडे (वय ६०, सर्व रा. ) यांचा समावेश आहे.

जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

-----

Web Title: A jeep hitting a truck parked on the side of the road; Five killed on the spot; 11 injured