पत्र्याच्या शेडमध्ये जीप घुसवली; स्वयंपाक करणारा परप्रांतीय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:20 IST2021-02-15T04:20:44+5:302021-02-15T04:20:44+5:30

रामप्रताप रावत हे उत्तर परदेशातून जगण्यासाठी येथे आले होते. ते एका पेट्रोलपंपाजवळच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. अपघातापूर्वी ते त्या ...

The jeep entered the leaf shed; Cooking alien kills | पत्र्याच्या शेडमध्ये जीप घुसवली; स्वयंपाक करणारा परप्रांतीय ठार

पत्र्याच्या शेडमध्ये जीप घुसवली; स्वयंपाक करणारा परप्रांतीय ठार

रामप्रताप रावत हे उत्तर परदेशातून जगण्यासाठी येथे आले होते. ते एका पेट्रोलपंपाजवळच पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. अपघातापूर्वी ते त्या शेडमध्ये स्वयंपाक करत होते. त्याच्या शेडजवळ अक्षय जमदाडे याने जीप लावून दुसऱ्या पंपावर गेला होता. तेव्हाच त्याच्यासोबत काम करणारा रमेश शिवकुमार यादव याने कोणालाही न सांगता ती जीप बाहेर काढून वेगाने त्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसवली. त्यात स्वयंपाक करणारे रावत हे जागीच ठार झाले. शिवाय नंतर ती जीप खड्ड्यात पल्टी झाली. याबाबत मयताचा मुलगा सोनू रामप्रताप रावत याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी चालक रमेश शिवकुमार यादव, रा. बार्शी याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. पुढील तपास फौजदार शिंदे करीत आहेत.

Web Title: The jeep entered the leaf shed; Cooking alien kills