गुटखा वाहतूक करणारा जीप पकडली, दहा लाखाचा गुटखा जप्त
By प्रताप राठोड | Updated: March 28, 2023 18:06 IST2023-03-28T18:06:00+5:302023-03-28T18:06:08+5:30
याप्रकरणी पोलिसांनी टेम्पाचालकास ताब्यात घेतले आहे.

गुटखा वाहतूक करणारा जीप पकडली, दहा लाखाचा गुटखा जप्त
सोलापूर : सुंगधीत पान मसाला गुटख्याच्या पुड्या घेऊन येणारी जीप शहर पोलिस पथकांनी अडवून गाडीतील जवळपास ९ लाख ६० हजार रुपयाचा पान मसाला गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पाचालकास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी सोलापूर रोडवरील बालाजी कॉलनीजवळ (ता. बार्शी, जि. सोलापूर) केली.
सोलापूर रोडवर एम.एच.४३ ए.डी. ९७९८ या क्रमाकांची जीप संशयितरित्या उभी असल्याने पोलिसांनी चालक अशपाक जवाहर आत्तार (वय ३०, रा. मालवंडी, ता.बार्शी) याला विचारणा केल्यानंतर त्याने सुंगधीत पान मसाला गुटखा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी गाडीतून २० गोण्यातून चार हजार पुडयासह जवळ जवळ ९ लाखाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी चालकास अटक करत जीप देखील जप्त केली. यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागास याबाबत माहिती देण्यात आली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.