शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

जेईई अ‍ॅडव्हान्समध्येही सोलापूरच्या गुणवंतांची बाजी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:53 IST

संगमेश्वरचाही निकालात दबदबा : ‘वालचंद’चा धीरज सुरते अनुसूचित प्रवर्गातून तर समर्थ पोतदार इतर मागासातून अव्वल

ठळक मुद्देशेतकºयाच्या ‘रितू’नं मिळवलं कौतुकास्पद यशबाकलीवालचे १५ विद्यार्थी ‘आयआयटी’साठी पात्र‘लॉजिक’चंही लॉजिक ठरलं यशस्वी..

सोलापूर :  देशपातळीवर प्रतिष्ठेची समजल्या जाणाºया जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचा शुक्रवारी निकाल जाहीर झाला.  यामध्ये सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयाच्या धीरज राज सुरते याने अनुसूचित जाती प्रवर्गामधून २४३१ वी रँक मिळवली तर याच महाविद्यालयाच्या समर्थ पोतदार याने इतर मागास वर्गातून २४५०  वी रँक मिळवली. याशिवाय संगमेश्वर महाविद्यालयाचा विश्वनाथ पवार  ईडब्ल्यूएस या विभागात भारतातून ६५४ वा आला तर अथर्व गोखले ९ हजार ५६ वा आला. बाकलीवाल क्लासचे १५ विद्यार्थी आणि लॉजिक इन्स्टिट्यूटचे ५ विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र ठरले आहेत.

दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटीसाठी प्रयत्न करत असतात. यंदाही अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. धीरजने याने भारतात २  हजारावा क्रमांक मिळवत आयआयटीमध्ये एन्ट्री केली आहे. धीरज हा सोलापुरातील वालचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. २७ मे रोजी आयआयटीतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती.  यंदाच्या परीक्षेत पहिल्यांदाच पर्सेंटाईल पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. धीरजने ८४ पर्सेंटाईल गुण मिळवत यश संपादन केलं आहे. मुंबई आयआयटीमध्ये मेकॅनिकल विभागात प्रवेश घेण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. 

संगमेश्वरच्या विश्वनाथ पवार, अथर्व गोखले, मुदय्या स्वामी यांनी उल्लेखनीय यश मिळवले. यात विश्वनाथ पवार याने ईडब्ल्यूएस या विभागात भारतातून ६५४ वा येण्याचा मान मिळवला. तर अथर्व गोखले ९ हजार ५६ वा आला. आणि मुदय्या स्वामी  हा ओबीसी प्रवर्गातून ६ हजार ५७३ वा क्रमांक पटकावला आहे. 

या तिघांना अनुक्रमे  एकूण २७२ गुणांपैकी  (पवार १४४, ,गोखले १३१ आणि स्वामी ८८) एवढ्या गुणानुक्रमांकासह संगमेश्वरचे हे विद्यार्थी सोलापुरातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेमध्ये अव्वल राहिले. या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव धर्मराज काडादी , प्राचार्य शोभा राजमान्य, उपप्राचार्य आनंद हुली, लॉजिकचे प्रा.सुशांत माळवे आदींनी अभिनंदन केले. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

‘लॉजिक’चंही लॉजिक ठरलं यशस्वी..- लॉजिक इन्स्टिट्यूटच्या पाच विद्यार्थ्यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शिक्षक सुशांत माळवे, शिवराज बगले आणि अविनाश घोडके यांनी त्यांचे अभिनंदन केले. या यशवंत विद्यार्थ्यांंमध्ये विश्वनाथ पवार (देशात ७०२९ वी रँक), अथर्व गोखले (९९५६ रँक), समर्थ पोतदार (१२६२ रँक), मुदय्या स्वामी (कॅटेगिरी रँक ६५७३) आणि अथर्व शिंदे (कॅटेगिरी रँक- २७५९) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी एमएचटी सीईटी आणि जेईई मेन्स २०१९ मध्येही घवघवीत यश मिळवले आहे.

बाकलीवालचे १५ विद्यार्थी ‘आयआयटी’साठी पात्र- यंदाच्या वर्षी २०१९ मध्ये बाकलीवाल क्लास सोलापूर सेंटरचे १५ विद्यार्थी प्रतिष्ठित समजल्या जाणाºया आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये प्रथमेश कणबसकर (देशभरातून २२५२ रँक), यश भागवत (२५६९), अभय कडप्पा (९४४), विनीत डोके (१०४६), निरज रव्वा (३९७१) आणि रितू पाटील (४३१४) असे आॅल इंडिया रँक मिळवून त्यांनी सोलापूरचे नाव उंचावले आहे. सोलापूर जिल्ह्यातून आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून प्रथम येण्याचा मान बाकलीवाल सोलापूर सेंटरने मिळवला असल्याचे क्लासच्या संचालिका भारती शहा यांनी स्पष्ट केले. 

शेतकºयाच्या ‘रितू’नं मिळवलं कौतुकास्पद यश- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी नीलकंठ पाटील यांच्या कन्या रितू पाटील या विद्यार्थिनीनं जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेमध्ये ओबीसी प्रवर्गात देशभरातून ४३१४ वी रँक मिळवली. दररोज मुळेगाववरुन १२ कि. मी. ये-जा करुन तिने आठ तास अभ्यास करुन आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. बाकलीवाल क्लास आणि एसईएस कॉलेजमधून अध्यापनाचे धडे तिने घेतले. आई संगीता आणि वडील नीलकंठ यांच्या पाठिंब्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो. त्यांनी सतत माझ्या पाठीशी राहून प्रोत्साहन दिल्यामुळेच मी हे यश मिळवू शकले असं रितूनं सांगितलं. ही आनंदाची वार्ता कळताच आई-वडिलांनी तिला पेढा भरवून लेकीनं आमचा विश्वास सार्थ केल्याच्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Solapurसोलापूरexamपरीक्षाEducationशिक्षण