शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रामाकडे जावा किंवा काशीला तुम्ही लाेकांच्या मनातून उतरला; सदाभाऊ खोतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 12:34 IST

सदाभाऊ खाेत : आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका

सोलापूर : राज्यातील मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बाेलायला हवे. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि त्यांचे युवराज देशाच्या वारीवर जातात. रामाकडे जावा किंवा काशीला जावा, तुम्ही जनतेच्या मनातून उतरले आहात, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी येथे केली.

पंचायत समितीच्या समितीच्या दाैऱ्यानिमित्त खाेत सोलापूर शहरात आहेत. खाेत यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका केली. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. गोंधळ घातला. भाजपवर टीका करताना ज्यांनी राममंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे सांगितले. आता तेच लाेक अयाेध्येला निघाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या देहू दाैऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हाेत्या. यावर खाेत म्हणाले, मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा, बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा टाेला खाेत यांनी लगावला.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे