शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

जालियनवाला बाग हत्याकांडाची शतकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:02 IST

जालियनवाला बाग हत्याकांड; आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली.

१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. इंग्लंडसहित दोस्तराष्टÑांची या युद्धात सरशी झाली होती. त्यामुळे ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत मुजोरी व मस्तवालपणा शिरलेला होता. जगभर पसरलेले ब्रिटिश साम्राज्य अधिक मजबूत व्हावे म्हणून वसाहतीमधील ब्रिटिश प्रशासन अधिक सतर्क होते. या प्रशासनात असणाºया अधिकाºयांची मानसिकता अरेरावी, उद्धट व आक्रमक होती.

इंग्लंडमधील राज्यकर्ते यांनी रौलेट कमिशन नेमले होते. त्यांनी ब्रिटिश सत्ता अधिक मजबूत व्हावी म्हणून कायद्याचे प्रारूप इंग्लंडच्या कायदे मंडळात मांडले होते. त्याला रौलेट अ‍ॅक्ट म्हणतात. या रौलेट अ‍ॅक्ट कायद्याप्रमाणे कोणालाही विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार होते.

स्वातंत्र्यासाठी भारतात काँग्रेससहित अनेक राजकीय गट-तट कार्यरत होते. या कायद्याने लोकचळवळ दाबली जाणार हे त्यांनी ओळखले होते. अनेकांनी या कायद्याला विरोध केला. काही लोकांनी त्याला ‘काळा कायदा’ म्हटले. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर (पंजाब) गावात सुवर्णमंदिराशेजारी असणाºया जालियनवाला बागेत हजारो स्त्री-पुरुष प्रार्थनेसाठी सभेत जमले होते. या सभेत स्वातंत्र्याचा जयजयकार होत होता. तसेच महात्मा गांधींचाही जयजयकार होत होता.

या बागेत जाण्यासाठी सात ते आठ फुटांची एकमेव चिंचोळी वाट होती. या  एकाच मार्गाने लोक आत येत व बाहेरही जात असत. ही वाट जनरल डायर या ब्रिटिश अधिकाºयाने आपल्यासोबत आणलेल्या शिपायांसह अडविली. हा प्रकार पाहून सभेत जमलेले लोक भांबावले. काही जण हताश झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता डायरने आपल्या शिपायांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. काही मिनिटांत त्या बागेत अनेक लोक जमिनीवर पडले. जखमी स्त्री-पुरुषांच्या किंकाळ्यांनी भरून गेली. या हत्याकांडात ३७९ लोक मृत्युमुखी पडले़ सुमारे १२०० पेक्षा अधिक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला, जगही हादरले.

नि:शस्त्र व शांततेने एकत्र येणाºया व मैदानात प्रार्थना करणाºया जमावावर अमानुष गोळीबार होण्याची घटना प्रथमच घडली होती. सर्व जगातून निषेध होऊ लागला. ‘ब्रिटिश परंपरेला कलंक लावणारी गोष्ट झाली’ असे चर्चिल म्हणाले. ब्रिटिशांच्या या अत्याचाराचा रवींद्रनाथ टागोरांवर एवढा परिणाम झाला की, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेला ‘नाईट हूड’ ही पदवी त्यांनी परत केली. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धात ब्रिटिशांच्या शांती व सेवासेनेत दाखल होऊन उपकारक काम केल्यामुळे त्यांना हिंद केसरी (कैसर-ए-हिंद) ही पदवी दिली होती. गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करून ही पदवी ब्रिटिशांना परत केली. महात्मा गांधी म्हणाले, ‘हे राज्य ईश्वराचे नसून, सैतानाचे आहे.’

काँग्रेसने हत्याकांडाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी गांधीजींवर सोपविली. गांधीजी अनेक दिवस अमृतसरमध्ये राहिले. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. हत्याकांड व जुलूम जबरदस्तीचे तपशील एकत्र आले. गांधींच्या शिस्तप्रिय व विधिज्ञ वृत्तीमुळे पाशवी व जुलमी वृत्तीचे स्वरूप संपूर्ण जगाला माहीत झाले.

आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली. असहकार आंदोलन, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, छोडो भारत चळवळ या मार्गाने जनतेचा सहभाग वाढवून साम्राज्यवादाला धक्के दिले जाऊ लागले. या सर्व महासंग्रामात जालियनवाला बागेतील निरपराध व नि:शस्त्र जनतेप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू घडून आला. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. आजचा दिवस त्यांच्या त्यागाचा व समर्पित जीवनाची आठवण करण्याचा आहे. या सर्व हौतात्म्य पत्करणाºया कार्यकर्त्यांना नम्र आदरांजली. या हत्याकांडानंतर बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली. सरदार उधमसिंग या तरुणाने १९४० साली जनरल डायर याचा लंडनमध्ये गोळ्या घालून खून केला व भारतीयांच्या मनातील बदला घेण्याची पूर्तता केली.-  एस. एस. सलगर(लेखक हे समाजसेवक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर