शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सोलापूरातील डॉक्टरांच्या उत्पन्नावर ‘आयटी’ ची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 2:38 PM

प्राप्तीकर विभागाचे संकेत : दोन छाप्यानंतर सर्च मोहिमेला गती

ठळक मुद्देदोन ठिकाणांच्या छाप्यानंतर आय.टी. विभागाच्या सर्च मोहिमेला गती आयकर विभागाच्या वतीने नुकतेच शहर व जिल्ह्यात दोन छापे टाकण्यात आले अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ

सोलापूर : शहरातील एक नामवंत डॉक्टर व अक्कलकोट तालुक्यात मनिलॅन्डर्स चालवणाºया ज्वेलर्सवर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर जिल्ह्यातील प्रतिथयश डॉक्टरांच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स (आय.टी.) विभागाने करडी नजर केली आहे. दोन ठिकाणांच्या छाप्यानंतर आय.टी. विभागाच्या सर्च मोहिमेला गती आली आहे. 

आयकर विभागाच्या वतीने नुकतेच शहर व जिल्ह्यात दोन छापे टाकण्यात आले आहेत. अक्कलकोट शहरातील मनिलॅन्डर्स चालवणाºया ज्वेलर्स दुकानावर टाकण्यात आलेल्या छाप्यात वार्षिक व्यवहारात ३ कोटींची तफावत आढळून आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टराच्या घरी ८0 लाखांची बेनामी मालमत्ता आढळून आली. दोन्ही ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यात आयकर विभागाच्या वतीने सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तब्बल दोन दिवस ही सर्च मोहीम सुरू होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

सोलापूर मेडिकल हब म्हणून ओळखले जात आहे. शहर व जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल सुरू आहेत. या हॉस्पिटलमध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यातील विजापूर, गुलबर्गा, इंडी, बीदर, आळंद आदी भागातून मोठ्या प्रमाणात रूग्ण उपचारासाठी येत असतात. जिल्ह्याशेजारी असलेल्या उस्मानाबाद, लातूर, बीड आदी जिल्ह्यांतूनही अनेक रूग्ण हे उपचारासाठी येत असतात. तालुका पातळीवरही अनेक खासगी हॉस्पिटल आहेत. या सर्व हॉस्पिटलच्या उत्पन्नावर आता आयकर विभागाने नजर वळवली आहे. सराफ व्यापाºयांवरही आयकर विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. आयकर कलम १३३ (अ) नुसार आयकर विभागाला सर्व्हे करण्याचा अधिकार आहे. शहर व जिल्ह्यातील संशयित व्यापारी व डॉक्टरांवर ही मोहीम होत आहे. 

गोपनीय मोहीम...च्आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही मोहीम हाती घेतली आहे. अक्कलकोट येथील सराफ आणि सोलापूर शहरातील डॉक्टरवर करण्यात आलेल्या सर्च माहिमेनंतर आता कोणाचा नंबर लागणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे. आयकर विभागाकडून संशयितांची यादी तयार करण्यात आली असून, दिवाळीपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे यंदाची दिवाळी कोणाकोणाला कडू जाणार याची चर्चा मात्र सर्वत्र रंगत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरIncome Taxइन्कम टॅक्सdocterडॉक्टरBanking Sectorबँकिंग क्षेत्र