शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आयुष्याचा कोळसा होण्याची वेळ आली, मात्र माणुसकी धावून आली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:51 IST

मुंढेवाडीच्या रयत फाउंडेशनची कनेक्टीव्हिटी; ५० गरजूंना केली मदत अन् जागृती

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे लोणावळा येथील ७ आदिवासी कुटुंब गेल्या वर्षभरापासून कोळसा कामगार ७ कुटुंबातील ५० सदस्यांसाठी आवश्यक ते किराणा साहित्य, भाजीपाला तर दिलामदतीला माणुसकी धावून आली अन् त्यांच्या चेहºयावरचं हास्य फुलले

वडवळ : त्यांचं जगण्याचं साधन म्हणजे कोळसा..चिलारी काटेरी झुडपे तोडायची... ती जाळायची अन् कोळसा तयार करून विकायचा.. पोट भरायचं.. मात्र कोरोनाच्या विळख्यात हा कोळसा देखील अडकला.. सगळंच ठप्प झालं... आता यांच्याच जीवनाचा कोळसा होण्याची वेळ आली होती, मात्र त्यांच्या मदतीला माणुसकी धावून आली अन् त्यांच्या चेहºयावरचं हास्य फुलले ..सगळीकडे संचारबंदी असली तरी ही माणुसकी मात्र   कनेक्ट झाली...

मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे लोणावळा येथील ७ आदिवासी कुटुंब गेल्या वर्षभरापासून कोळसा कामगार म्हणून कार्यरत आहेत. येथील सर्व कामे उरकून ही कुटुंबं गावाला जायच्या तयारीत होती.  तेवढ्यात या कोरोनामुळे हे सर्व कामगार या गावातच अडकून पडले.  त्यांनी तयार केलेला माल कुठे विकता येईना. त्यांचा मालक (मुकादम) ही दळणवळणाचे साधन नसल्या कारणाने मुंढेवाडी येथे येऊ शकला नाही. त्यामुळे या कामगारांची जगण्याची पंचायत झाली. ही बाब गावातील रयत फाउंडेशन कार्यकर्त्यांच्या नजरेस आली. त्यांनी तत्काळ या ७ कुटुंबातील ५० सदस्यांसाठी आवश्यक ते किराणा साहित्य, भाजीपाला तर दिलाच  मात्र या कोरोनाविषयी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देखील दिली.

सध्या हे सर्व कुटुंबीय शेतकºयांशी संपर्क साधून त्यांचे जळण तोडून देण्याचे काम करून आपला प्रपंच चालवत आहेत. रयत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  श्रीकांत डोंगरे, संतोष डोंगरे,सुनील व्यवहारे, राजू लिगाडे, किरण व्यवहारे, विजय व्यवहारे यांनी मात्र त्यांच्यासाठी हा मदतीचा हात दिला आहे.

अन्य मंडळीही मदतीसाठी सरसावलीतलाठी एम. एन. हकीम व मुंढेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व रेशन दुकानदार मोहन चौगुले यांनी स्वखर्चाने देखील प्रत्येक कुटुंबाला  दैनंदिन लागणाºया वस्तू पुरविल्या अशी कुटुंबं या ठिकाणी कायम वास्तव्यास राहण्यास नसतात त्यामुळे त्यांची रेशन कार्ड नसतात तरीही आम्ही स्वखर्चातून त्यांना जमेल ती मदत केली असल्याचे मोहन चौगुले यांनी सांगितले.

कोरोनामुळे सगळेच काही संपले असे नाही. आपण आपली माणुसकी मात्र जिवंत ठेवायला हवी. आमच्या गावातील या कुटुंबाची जमेल ती मदत आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहोत. याचे समाधान नक्कीच वेगळे आहे.- श्रीकांत डोंगरे, अध्यक्ष, रयत फाउंडेशन, मुंढेवाडी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmohol-acमोहोळ