शिक्षकांच्या विधायक कामामुळे गाव एक होते याची प्रचिती आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:22 IST2021-09-25T04:22:36+5:302021-09-25T04:22:36+5:30
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला स्वामी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी ...

शिक्षकांच्या विधायक कामामुळे गाव एक होते याची प्रचिती आली
ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला स्वामी यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे, विस्तार अधिकारी बजरंग पांढरे, ज्ञानेश्वर साळुंखे, सरपंच मनोज पुजारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयसिंह पाटील, दामाजीचे संचालक राजन पाटील, उपसरपंच आण्णासाहेब पाटील, संदीप पाटील, ग्रामसेवक संजय शिंदे, सचिन जाधव, प्रदीप खांडेकर, सज्जनराव पाटील, प्रताप पाटील, बबन पाटील, सुनील पाटील, निगप्पा बिराजदार, सविता कुदळे, सुवर्णा सोमदळे आदी उपस्थित होते.
‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या मोहिमेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जिल्ह्यातील शाळांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा घेतलेला वसा आणि त्यातून प्रेरित होऊन मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश शाळांनी केलेले काम याचा आढावा घेतला. तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल सर्वांसमोर कौतुकाची थाप दिल्याने मंगळवेढा तालुक्याच्या शैक्षणिक टीमचा उत्साह आणि आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचे दिसत आहे.
शिक्षक अन् ग्रामस्थांचा सत्कार
उपक्रमशील शिक्षक, दानशूर ग्रामस्थ यांच्या भरीव योगदानातून कायापालट झालेली दिमाखदार ब्रह्मपुरी शाळा पाहून भारावलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी स्वतः सत्कार न स्वीकारता सरपंच मनोज पुजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजयसिंह पाटील यांच्यासह दानशूर पालक आणि मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार केला.
फोटो ओळी :::::::::::::
ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या भेटीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, विजयसिंह पाटील, राजन पाटील, मनोज पुजारी आदी उपस्थित होते.