पाऊस पडतोय मस्तचंय पण पेरणीसाठी अजुन दमदार पाहिजे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:30 IST2021-06-16T04:30:22+5:302021-06-16T04:30:22+5:30
मृग नक्षत्र निघाल्यानंतर पाच दिवस कोरडे गेल्यानंतर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस तालुक्यात पाऊस पडला आहे. दोन दिवसात ...

पाऊस पडतोय मस्तचंय पण पेरणीसाठी अजुन दमदार पाहिजे!
मृग नक्षत्र निघाल्यानंतर पाच दिवस कोरडे गेल्यानंतर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस तालुक्यात पाऊस पडला आहे. दोन दिवसात जवळपास एकूण ४० मि.मी. पाऊस पडला आहे. दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडला असला तरी झालेल्या पावसावर संपूर्ण तालुक्यात खरीप पेरणी होऊ शकत नाही. आणखीन एखादा दमदार पाऊस पडल्यानंतर मात्र शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहे. मागील वर्षी आतापर्यंत ५७.५ मि.मी. इतका १०६ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी ७६.८ मि.मी. म्हणजे १४२ टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १९ मि.मी. पाऊस अधिक पडला आहे.
-------
मार्डी मंडलात कमी पाऊस
१३ जूनपर्यंत तालुक्यात सरासरी ५४.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ७६.८ मि.मी. पाऊस पडला आहे. शेळगी मंडल सर्वाधिक १०३.७ मि.मी., सोलापूर ७९.८ मि.मी., वडाळा ७० मि.मी.,तिऱ्हे ६७ मि.मी. मार्डी ६२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
----
उडीद, मूग व तूर बियाणाचा केवळ महाबीज कंपनीच्या बियाणाचा तुटवडा आहे. युरिया व डीएपीची टंचाई असल्याने खताचा अट्टाहास न धरता इतर एनपीके खताचा वापर करावा. खासगी कंपनीचे बियाणे खरेदी करा परंतु बिल, रिकामी पिशवी, पिशवीचा टॅग व थोडेसे बियाणे जपून ठेवा.
- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी
----