आयपीएस अधिकारी सलमानताज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:21 IST2021-02-12T04:21:46+5:302021-02-12T04:21:46+5:30
सोलापूर : लखनौ आणि सुलतानपूरचे पोलीस अधीक्षक सलमानताज पाटील यांना कोविडची लागण झाली होती. त्यांनी सोलापूर येथील छत्रपती ...

आयपीएस अधिकारी सलमानताज पाटील
सोलापूर : लखनौ आणि सुलतानपूरचे पोलीस अधीक्षक सलमानताज पाटील यांना कोविडची लागण झाली होती. त्यांनी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतले.
सलमानताज पाटील हे सुटीवर आहेत. ते सपत्नीक सोलापुरात आले आहेत. खाजगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोविडची लागण झाली होती. त्यांना महागडे उपचार घेणे शक्य होते; परंतु त्यांनी आवर्जून शासकीय रुग्णालयाची निवड केली. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले. या काळात त्यांनी चांगला अनुभव मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सहा महिन्यांपूर्वी सोलापुरातील त्यांचे संपूर्ण कुटुंबीय कोविड पॉझिटिव्ह होते. त्यातच मातोश्रींचे निधन झाले आहे. ही पार्श्वभूमी असतानाही त्यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयाची निवड केली, हे विशेष.