शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीचे आंदोलन मोडीत काढण्याचा डाव; अज्ञात दुचाकीस्वारांनी दाखवला तलवारीचा धाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 13:14 IST

मंगळवेढा -गाळप केलेल्या उसाची एफआरपीच्या 14 टक्के रकमेसह ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ...

ठळक मुद्देऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन

मंगळवेढा -गाळप केलेल्या उसाची एफआरपीच्या 14 टक्के रकमेसह ऊसदर जाहीर करावा, या मागणीसाठी दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन अज्ञात दोन इसमांनी तलवारीची भीती दाखवत मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंगळवेढा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दाखल करण्यात आली.

याबाबतची फिर्याद दत्तात्रय लक्ष्मण पाटील (रा. मरवडे) यांनी दिली असून, फिर्यादीत म्हटले आहे, की गाळप केलेल्या उसाची तोडणी केल्यापासून 14 दिवसांच्या आत ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. असे असताना दामाजी साखर कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुल घुले, श्रीमंत केदार व राजेंद्र रणे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू असताना काल (शुक्रवारी) रात्री 10.30 वाजता मुख्य चौकापासून लाल रंगाच्या डिस्कवर गाडीवरून 35 ते 40 वयोगटातील अज्ञात दोघे आले. मागे बसलेल्या इसमाने भगवा शर्ट घातलेला होता.  त्यांच्या हातात तलवारी होत्या. त्या तलवारीचा धाक दाखवून समोरून जात धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यांचा चेहरा व्यवस्थित ओळखता आला नाही. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेले दोन होमगार्ड त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाहीत.

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मरवडे येथे ट्रॉली जाळण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता, तसाच प्रकार शेतकऱ्यांकडून बालाजीनगर येथेही झाला.  या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक घेत त्या बैठकीत 15 तारखेपर्यंत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagricultureशेती