शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धा बाजूला सारून नेत्रदान अन् अवयवदानासाठी पुढे या: तात्याराव लहाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 13:13 IST

सुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. श्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते असेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देसामान्यातून मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो - डॉ. तात्याराव लहानेसुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे - डॉ. तात्याराव लहानेश्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते - डॉ. तात्याराव लहाने

माढा : आपण अंधश्रद्धेमुळे अवयवदान, नेत्रदान, देहदान करत नाही. वास्तविक पाहता आपल्या मृत्युनंतर मौल्यवान अवयव जाळून टाकतो. त्यापेक्षा नेत्रदान केल्यास दोघांना दृष्टी मिळेल. आपणांमध्ये असलेली सर्व अंधश्रद्धा बाजूला सारा. समाजातील अन्य जीवित गरजूंच्या मानवीय सेवेसाठी नेत्रदान व अवयवदानासाठी पुढे या, इतरांनाही यासाठी प्रेरित करा, असे आवाहन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. माढा येथील माढेश्वरी बँकेने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन समारंभानंतर त्यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.

अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळाले आहे. माझ्या आईने पंचवीस वर्षांपूर्वी मला स्वत:ची किडनी दिल्याने मी आज हे काम करू शकतो. त्यामुळे सुशिक्षित लोकांनी नेत्रदान व अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक केली पाहिजे. श्रीलंकेत भारतापेक्षा कितीतरी अधिक पटीने नेत्रदान केले जाते असेही त्यांनी सांगितले.

माणसाला मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय मोठे होता येत नाही. सामान्यातून मोठे होण्यासाठी संघर्ष करावा लागतो, असेही ते म्हणाले. जंकफूड आपल्या शरीरासाठी घातक आहे. आपल्या जिभेला लगाम घाला आणि जंकफूड टाळा. भाकरी, भाजी खा आणि भरपूर आयुष्य जगा, असा संकल्प या नवीन वर्षात करा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी गोड पदार्थ टाळा. रोज व्यायाम करा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्त्वयुक्त पदार्थ खा. औषधे टाकल्याने डोळे खराब होतात. सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने डोळे धुवा. आपल्या पाल्यांचे डोळे आपण खराब करत आहोत. सहा वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा रडू लागला की, त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात पालक मोबाइल देतात. तो रडतो म्हणून मोबाइल देणे म्हणजे त्याच्या डोळ्यांचे नुकसान करणे. दिवसभर मोबाइल पाहिल्याने एक डोळा अधू होतो. घरात आल्यावर मोबाइल बंद करा, असा सल्ला त्यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरinterviewमुलाखतHealthआरोग्यOrgan donationअवयव दान