शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Good News; इंटरसिटी, इंद्रायणी, सिद्धेश्वर एक्सप्रेस १५ सप्टेंबरनंतर धावतील 

By appasaheb.patil | Updated: September 12, 2020 12:23 IST

लवकरच दिलासा : मध्य रेल्वेच्या अधिकाºयांचा सरकारसोबत समन्वय सुरू

ठळक मुद्देसाहजिकच सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाºया गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या. मात्र त्या गाड्यांची वेळ व कामाची वेळ यात मोठा फरक इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्वर एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल

सोलापूर : रेल्वे मंत्रालय हे कोणत्या गाड्या सुरू करावयाच्या याबाबत संबंधित राज्याशी समन्वय साधत आहे़ वाढत्या कोरोनामुळे या गाड्या सुरू होण्यास विलंब होत आहे़ कोणत्या शहराला किती रेल्वे फेºयांची आवश्यकता आहे, हे निर्धारित करण्यात येईल. याबाबतचा आढावा घेतल्यानंतरच रेल्वे सेवा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय होईल. येत्या काळात सणासुदीच्या दिवसांचं सत्र सुरू होणार आहे. परिणामी प्रवाशांकडून रेल्वे सेवांच्या मागणीत होणारी वाढ पाहता सिद्धेश्वर, इंद्रायणी व इंटरसिटीबाबतच्या गाड्या सुरू करण्याबाबतचा मोठा निर्णय १५ सप्टेंबरनंतरच्या टप्प्यात होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाकाळात संसर्ग वाढू नये म्हणून भारतीय रेल्वे मंत्रालयाने प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या़ अनलॉक चारनंतर शासनाने शिथिलता दिल्याने मुुंबई, पुण्यातील बहुतांश कंपन्या, शासकीयसह खासगी कार्यालये सुरू झाली़ त्यामुळे साहजिकच सोलापूरहून पुणे, मुंबईला जाणाºया गाड्यांची ओढ प्रवाशांना लागली आहे़ रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या. मात्र त्या गाड्यांची वेळ व कामाची वेळ यात मोठा फरक होता़ इंटरसिटी, इंद्रायणी व सिद्धेश्वर एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्यास हजारो प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा रेल्वे प्रवासी संघटनांसह सर्वसामान्य प्रवाशांना लागून राहिली आहे.

दरम्यान, लॉकडाऊन काळात रेल्वे प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजना, करण्यात आलेली विविध कामे, दुहेरीकरण, विद्युतीकरण, श्रमिक ट्रेन, मालवाहतूक, किसान रेल, रो-रो रेल्वे सेवा यांसह विविध उपक्रमांविषयी विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली़ यावेळी अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक व्ही़ के़ नागर, वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक प्रदीप हिरडे उपस्थित होते.

३० ट्रेनद्वारे ३५ हजार कामगारांना घरी पोहोचविले...कोरोनाकाळात भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून परप्रांतीयांना त्यांच्या मूळ घरी पोहोचविण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सोलापूर विभागाने ३० ट्रेनद्धारे ३४ हजार ७६१ कामगारांना त्यांच्या मूळगावी पोहोचविण्यात यश मिळविले़ सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, कलबुर्गी, अहमदनगर, दौंड, शिर्डी या स्थानकांवरून या श्रमिक ट्रेन धावल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी दिली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे