शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Intarview; खातेदार जोडल्याने ठेवीत मोठी वाढ; चार महिन्यात २१६९ कोटींचा झाला व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:10 IST

सोलापूर जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद

ठळक मुद्देखेड्यापाड्यात लहान-मोठे व्यवसाय करणाºयांना कर्ज देण्यास सुरुवातसध्या जिल्ह्यातील १४ पेट्रोल पंपाचे व्यवहार जिल्हा बँकेतून बँकिंग क्षेत्रातील होणारे बदल स्वीकारुन शेतकºयांची बँक ही ओळख ठेवण्याचा प्रयत्न

अरुण बारसकर

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भलताच बोलबाला होता; मात्र  थकबाकीमुळे बँक अडचणीत आली ती काही केल्या सावरली नाही म्हणून प्रशासक नेमले.  दुरावलेले व नवीन खातेदार जोडण्याचे काम सध्या सुरु केल्याने ठेवीत मोठी वाढ झाली आहे. झालेल्या बदलाबाबत प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याशी ‘लोकमत’ ने साधलेला संवाद.

प्रश्न : बँकेत नक्की काय सुधारणा झाल्या ?उत्तर : मार्च १८ मध्ये ठेवी २३३० कोटी होत्या त्या आॅक्टोबर महिन्यात १९०० कोटींवर आल्या होत्या. मार्च १९ मध्ये ठेवी २७१७ कोटींवर गेल्या. नवीन ७१ हजार ८३७ खातेदार जोडले. सोनेतारण योजना सुरू करून १०० कोटी कर्ज दिले. नागरी बँकांचे व्यवहार जिल्हा बँकेत सुरू झाले.  मार्च १८ मध्ये बाहेरचे कर्ज ३८८ कोटी होते ते परतफेड करून ७५ कोटींवर आणले. बिझनेस प्लॅननुसार कर्मचाºयांनी काम केल्याने हे शक्य झाले. 

प्रश्न : बिगरशेती थकबाकी वसुलीबाबत धोरण काय?उत्तर : बिगरशेतीच्या कर्जाची वसुली करण्यासाठी थेट कर्जदारांशी संवाद साधला. त्यांना एकरकमी परतफेड योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यामुळे तीन-चार संस्थांनी पैसे भरले. बिगरशेती कर्जाचे जवळपास २०२ कोटी वसूल झाले. अन्य थकबाकीदारांच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत अन् वर्षभरात बदलही दिसतील. 

प्रश्न : केवळ ठेवी वाढल्याने बँक पूर्वपदावर येईल का?उत्तर : नवीन ७२ हजार खातेदार जोडल्याने व्यवहार वाढला. बंद झालेला नागरी बँकांचा केवळ चार महिन्यात जिल्हा बँकेतून २१६९ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. सोनेतारण कर्ज योजनेमुळे नवीन कर्जदार जोडला गेला. लहान-लहान उद्योग करणाºयांना कर्ज दिले जाणार असल्याने तत्काळ वसुली होईल व व्यवहार वाढेल, अशा अनेक उपाययोजना करण्याचे नियोजन.

पेट्रोल पंपाचे व्यवहार सुरू जिल्ह्यातील पेट्रोल पंपाचे आर्थिक व्यवहार जिल्हा बँकेतून होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या १४ पेट्रोल पंपाचे व्यवहार जिल्हा बँकेतून होत असून दररोज एका पंपाचा दोन लाखांपासून १२ लाखांपर्यंत भरणा आमच्या बँकेत होत आहे. खेड्यापाड्यात लहान-मोठे व्यवसाय करणाºयांना कर्ज देण्यास सुरुवात केली असून त्यातून बँकेला मोठा फायदा मिळेल. 

सुरक्षित कर्जावर भर देणार सुरक्षित कर्ज देण्यावर भर राहील,  शाखा स्तरावर मायक्रो एटीएम बसविले जातील. संपूर्ण जिल्ह्यातील सर्व प्रकारचे घटक बँकेशी जोडल्याने ठेवी वाढतील व आर्थिक सुधारणा होईल. यातून मार्च २०२० पासून शेतकºयांना पुरेसे कर्ज देण्यात येईल. बँकिंग क्षेत्रातील होणारे बदल स्वीकारुन शेतकºयांची बँक ही ओळख ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. 

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक