वीजबील वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:24 IST2021-02-24T04:24:39+5:302021-02-24T04:24:39+5:30
महावितरण कंपनीचे सागर चतुरराव हाके हे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कडलास येथील एका चहा कॅन्टीनसमोर थांबले होते. यावेळी ...

वीजबील वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, दमदाटी; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
महावितरण कंपनीचे सागर चतुरराव हाके हे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास कडलास येथील एका चहा कॅन्टीनसमोर थांबले होते. यावेळी भाऊसो घोडके याने तेथे येऊन शामराव गायकवाड यांचे वीज कनेक्शन का तोडले, अशी विचारणा केली. यावेळी हाके यांनी थकीत वीजबिलापोटी त्यांचे कनेक्शन तोडले होते, परंतू गायकवाड यांनी वीजबिल भरल्याने त्यांचे वीज कनेक्शन जोडल्याचे सांगितले. त्यावेळी संतापलेल्या घोडके यांनी गायकवाड यांचेच कनेक्शन दिसले का, गावातील इतर कनेक्शन का तोडले नाहीत म्हणून शिवीगाळ करू लागला. त्या दरम्यान घोडके यांचा भाचा सूरज लक्ष्मण वाघमारे याने तेथे येऊन सागर हाके यांना शिवीगाळ करीत तुला बघतोच, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देवून दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तपास पोलीस हेडकॉन्सटेबल हजरत पठाण करीत आहेत.