शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

राज्यातील दूध उत्पादकांऐवजी भुकटीवाल्यांचेच उखळ पांढरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:39 IST

सरकारचा नवा निर्णय : शालेय विद्यार्थ्यांना पाकिटे वाटणार, खासगी संघांचीही चांदी

ठळक मुद्देदुधाबाबतचे सरकारचे धोरण म्हणजे शेतकºयांना खेळविण्याचा प्रकारपॉइंटला ३० पैसे कमी करण्याऐवजी एक रुपया कमी केलाशालेय विद्यार्थ्यांना पाकिटे वाटणार

अरूण बारसकर सोलापूर : मागील सव्वावर्षापासून दूध दराचे घोंगडे भिजत ठेवणाºया पशुसंवर्धन विभागाला आता दूध पावडर तयार करणाºया संस्थांचा भलताच कळवळा आला आहे. शेतकºयांकडून १५, १६ व १७ रुपयाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर बनली. या भुकटीला भाव मिळावा म्हणून सरकारने किलोमागे ५० रुपये अनुदान दिले. आता हीच पावडर शालेय विद्यार्थ्यांना वाटण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने दूध उत्पादकांचा लाभ होण्याऐवजी भुकटी उत्पादक आणि खासगी दूध संघांचे उखळ पांढरे होणार आहे.

अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्च-एप्रिल २०१७ मध्येच निर्माण झाला होता. राज्यातील दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार असल्याची बाब लक्षात आणून दिल्यानंतरही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकºयांनी संपाचे हत्यार उपसल्यानंतर थेट दूध दरवाढीचा आदेश काढून सरकार मोकळे झाले.

 राज्याच्या दुग्धविकास विभागाने काढलेल्या दरवाढीच्या आदेशाला खासगी संघांनी जुमानले नाही. गाईचे दूध प्रतिलिटर २७ रुपयाने खरेदी करण्याचा आदेश गुंडाळून ठेवून खासगी संघांनी स्वत:ची दरपत्रके काढण्यास सुरुवात केली. खेड्यापाड्यातील दूध १५ रुपयाने खरेदी सुरु असताना सरकार मूग गिळून गप्प होते. त्याचवेळी दूध पावडर व दूध खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय न घेतल्याने शेतकºयांना १५, १६ व १७ रुपये दर खासगी संघांनी दिला. 

पुढे सहकारी दूध संघांनीही खासगी संघांप्रमाणेच दर दिला. राज्यातील सहकारी व खासगी संघांनी कमी दराने खरेदी केलेले दूध ग्राहकांना ३६ ते ४० रुपयाने विकले. शिल्लक राहिलेल्या दुधाची पावडर बनवली. आता हीच पावडर सरकारने प्रतिकिलो ५० रुपये अनुदान घेऊन विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर करतेवेळी पावडरचा दर प्रतिकिलो १४० रुपये होता.

अनुदान सुरु झाल्यानंतर तो दर १६० रुपयांवर गेला आहे. म्हणजे दूध खरेदी १६ रुपयाने व त्यापासून तयार झालेली पावडर वाढीव दर व अनुदानासह शासनाला खासगी संघ विक्री करणार आहेत. २४ आॅगस्टला काढलेल्या शासन आदेशानुसार शाळेतील मुलांना दूध पावडर तीन महिन्यासाठीच वाटप करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पावडर २०० ग्रॅमच्या वजनाची असून एकाचवेळी तीन पाकिटे एका विद्यार्थ्याला दिली जाणार आहेत. पावडर देतेवेळीच दूध कसे तयार करायचे याची माहिती पालकांना दिली जाणार असल्याचे सांगितले़

कर्नाटकची कॉपी...

- कर्नाटकमध्ये क्षीर भाग्य योजना राबवली जाते. याच धर्तीवर महाराष्ट्रातील मुलांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. कर्नाटकमध्ये २५ रुपयांच्या दराने खरेदी केलेल्या दुधापासून जी पावडर मुलांना दिली जाते तीच महाराष्ट्रात १७ रुपयाने खरेदी केलेल्या दुधापासून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भुकटीवाल्यांचे भले होणार आहे़

दुधाबाबतचे सरकारचे धोरण म्हणजे शेतकºयांना खेळविण्याचा प्रकार आहे. पॉइंटला ३० पैसे कमी करण्याऐवजी एक रुपया कमी केला. सरकार कुणासाठी काम करतंय हे समजत नाही. ताजी पावडर घ्यायची असेल तर ती खाजगी ऐवजी सहकारी दूध संघांकडून मागवावी.-विनायकराव पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक कृती समिती

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधSchoolशाळाgovernment schemeसरकारी योजनाMahadev Jankarमहादेव जानकर