रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

By Admin | Updated: September 2, 2014 16:54 IST2014-09-02T16:42:45+5:302014-09-02T16:54:27+5:30

आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूपाभवानी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानातील विहिरीची पाहणी केली.

Inspection by the Municipal Commissioner's office of Rupabhabhani | रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

रूपाभवानी मंगल कार्यालयाची आयुक्तांकडून पाहणी

सोलापूर. - आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूपाभवानी मंगल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या उद्यानातील विहिरीची पाहणी केली. या विहिरीतील पाझर चांगले असल्याने गाळ काढल्यास पालिकेला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते अशी माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना दिली. सोलापूर : जोडभावी पेठ पोलीस ठाण्याची इमारत झुकल्याने रूपाभवानी मंदिर येथील मंगल कार्यालयाची जागा देण्याच्या उद्देशाने सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी पाहणी केली. पोलीस स्टेशन हलवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 
दयानंद महाविद्यालयाजवळील पाण्याच्या टाकीशेजारी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन आहे. काही वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेली ही इमारत झुकल्याने ती धोकादायक बनली आहे. तसेच अपुरी जागा, तोकडी बैठक व्यवस्था, मुद्देमालासाठी कमी जागा, महिला अधिकार्‍यांची होणारी गैरसोय या सर्व बाबींवर 'लोकमत'मधून प्रकाश टाकण्यात आला होता. याची दखल घेत पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांना पालिकेस तात्पुरत्या जागेचा प्रस्ताव पाठवून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खाडे यांनी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयुक्तांनी रूपाभवानी मंदिर येथील रूपाभवानी मंगल कार्यालयाला भेट दिली. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक जगदीश पाटील, शाहू शिंदे आदी रूपाभवानी मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते. आयुक्तांनी संपूर्ण मंगल कार्यालयाची पाहणी केली. दरम्यान प्रताप चव्हाण यांनी या मंगल कार्यालयाचा सध्या कसा दुरूपयोग होत आहे याची माहिती आयुक्तांना दिली. या ठिकाणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन झाल्यास मंदिर आणि महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला कसा फायदा होईल याची माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: Inspection by the Municipal Commissioner's office of Rupabhabhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.