शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

राज्यातील एक हजार उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणणार, महावितरणची माहिती

By appasaheb.patil | Updated: November 23, 2018 10:47 IST

राज्य सरकारने केली केंद्राकडे १३ हजार ७७७ कोटींची मागणी

ठळक मुद्देराज्यात २ कोटी १० लाख ग्राहकराज्यात शेतीपंपाच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरणचे गणित बिघडत चालले

सोलापूर : अपारंपरिक स्रोतांचा अधिकाधिक वापर व्हावा, शेतकºयांंना २४ तास वीजपुरवठा व्हावा आणि पर्यावरणाचे संतुलन साधावे, यासाठी राज्यातील १ हजार उपसा सिंचन योजनाही (लिफ्ट एरिगेशन) सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे़ यासाठी केंद्राकडे १३ हजार ७७७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस पुणे प्रादेशिकचे संचालक संजय ताकसांडे, बारामती परिमंडलाचे अभियंता पावडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते.

विश्वास पाठक यावेळी म्हणाले की,  शेतकºयांना दिली जाणारी औष्णिक वीज महाग असल्याने त्यावर अनुदान द्यावे लागते. परिणामी सरकारच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडतो. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर केल्यास हे वार्षिक अनुदान कमी होईल. शेतीला लागणाºया विजेबरोबरच आता उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालविण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. एका उपसा सिंचन प्रकल्पाला ६० ते १०० वॅट वीज लागते. या योजना अपारंपरिक ऊर्जेवर चालविल्या तर अनुदानाच्या रूपाने सरकारच्या तिजोरीवर पडणारा भारही कमी होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नियोजन करण्यात आले असून, येत्या तीन वर्षांत संपूर्ण राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. 

या योजनेमुळे १२ तास सौरऊर्जा उपलब्ध होऊन वीज बिलातही उपसा सिंचन योजनांना दिलासा मिळणार आहे़ कृषी ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा व्हायला मदत व्हावी व अकृषिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केलेली आहे़ या सर्वांमुळे वीज वितरण हानी कमी करता येणार असल्याचेही पाठक यांनी सांगितले़ 

थकबाकीमुळे महावितरणचं गणित बिघडतंयराज्यात २ कोटी १० लाख ग्राहक आहेत राज्यात सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे़ याशिवाय उत्पादकता कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे़ त्यामुळे राज्यात शेतीपंपाच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर पोहोचला आहे़ अशात यावर्षी शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे़ यामुळे शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे़ या शेतकºयांच्या वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरणचे गणित बिघडत चालले आहे़ परिणामी याचा बोजा इतर ग्राहकांवर पडत असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. 

अ‍ॅग्रिकल्चर फिडर योजना सुरूच्शेतीला सुरळीत वीजपुरवठा, विजेची होणारी हानी टाळण्यासाठी ‘एक ट्रान्स्फार्मर... एक शेतकरी’ (एका ट्रान्स्फार्मरवरून एका शेतकºयाला वीजजोडणी) योजना महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे़ या अ‍ॅग्रिकल्चर फिडर योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार शेतकºयांना येत्या चार महिन्यांत या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार आहे़ यासाठी २७६ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाले आहे़ याचा शुभारंभ टेंभुर्णी व मोहोळ येथून गुरुवारी करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणwater transportजलवाहतूकPower ShutdownभारनियमनGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना