ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:53+5:302021-02-05T06:43:53+5:30
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, भविष्य निर्वाह निधी मागील फरक व ऑनलाईन ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, भविष्य निर्वाह निधी मागील फरक व ऑनलाईन वेतन झाल्यापासून शासन व ग्रामपंचायत हिस्सा यातील तफावत रक्कम भरावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ऑनलाईन मासिक वेतनात फरकाची रक्कम ग्रामपंचायतकडून द्यावी. राहणीमान भत्ता मधील मागील फरकाच्या रकमा त्वरित द्याव्यात, कर्मचाऱ्यांचा गटविमा उतरविण्यात यावा, मासिक वेतन अप्ररोल वेळेत द्यावे, सेवापुस्तक दोन प्रतीत अद्ययावत करावे. अशा विविध मागणीचे निवेदन आमदार सचिन कल्याणशेट्टी, तहसीलदार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी जि. प. गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष हुवणा पुजारी, तुळशीराम इरवाडकर, गंगण्णा तोळणुरे, सूर्यकांत कलमनी, रजाक मुल्ला, दाऊद मुजावर, सुनील जमादार, लक्ष्मण कोळी, नरसिंह कुलकर्णी, मल्लिनाथ करवीर, सचिन गिरबोणे, यांच्यासह १२० कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले आहेत.
आंदोलन स्थळी उपसभापती प्रकाश हिप्परगी, पं. स. सदस्य राजेंद्र बंदिछोडे, प्रशासन अधिकारी हेरंबराज पाठक, विस्तार अधिकारी तुळजापुरे यांनी भेट देऊन संप मागे घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली मात्र यश आले नाही.
फोटोओळ २८अक्कलकोट-ग्रामसेवक
अक्कलकोट येथे पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलनास बसलेले ग्रामसेवक.