जिल्ह्यात लसीची संख्या वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST2021-07-07T04:28:05+5:302021-07-07T04:28:05+5:30
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यामध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असताना सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये त्या ...

जिल्ह्यात लसीची संख्या वाढवा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यामध्ये कोविड विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला असताना सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये त्या प्रमाणात लसीकरण होत नाही. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात फक्त ५ लाख ९० हजार लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात लसी उपलब्ध करणे गरजेचे असताना जाणूनबुजून जिल्ह्याला कमी लसी मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रात सर्वात कमी सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यातील जनतेवर अन्याय होत असून, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून नागरिकांचे लसीकरण करणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री राजेश शामगौडा पाटील येड्रावकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त, पुणे, जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले आहे.
---