एप्रिलपासून अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ
By Admin | Updated: May 7, 2014 00:09 IST2014-05-06T22:07:23+5:302014-05-07T00:09:13+5:30
शासन आदेश; सेवानिवृत्तीच्या लाभाचाही समावेश

एप्रिलपासून अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ
शासन आदेश; सेवानिवृत्तीच्या लाभाचाही समावेश
सोलापूर: अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एप्रिलपासून वाढ करणारा आदेश शासनाने काढला आहे. सेवानिवृत्तीच्या लाभाचाही या आदेशात समावेश आहे.
अंगणवाडी सेविकांना सरसकट (एस.एस.सी. उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, अनुभव) ९५० रुपये दरमहा वाढ केली आहे. मदतनिसांना दरमहा ५०० तर मिनी अंगणवाडी सेविकांना ४५० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ एप्रिल २०१४ पासून केली आहे. अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. मृत्यू झाल्यास सेविका एक लाख व मदतनीस-मिनी अंगणवाडी सेविकांना ७५ हजार रुपये दिले जाणार आहेत. या आदेशामुळे कर्मचार्यांत आनंद व्यक्त केला जात असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस ब्रीजपालसिंग बाघेल, उपाध्यक्ष सरला चाबुकस्वार, जिल्हाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी कळविले आहे.