शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कचºयातूनही मिळू लागले कुर्डूवाडी नगरपरिषदेला उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:44 IST

इरफान शेख  कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गोळा केलेल्या कचºयातून नगरपालिकेने ३० ते ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला ...

ठळक मुद्देकुर्डूवाडी शहरातील सर्व कचराकुंड्या पालिकेने बंद केल्या ओल्या कचºयापासून तयार झालेल्या कंपोस्ट खताची तपासणी पुणे विभागाच्या कृषी खात्याकडून घंटागाडीतूनच कचरा गोळा करण्यात येत आहे

इरफान शेख 

कुर्डूवाडी : स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत गोळा केलेल्या कचºयातून नगरपालिकेने ३० ते ४० हजार रुपयांचा महसूल गोळा केला आहे. यात निम्म्या ओल्या कचºयातून व निम्म्या सुक्या कचºयातून महसूल गोळा करण्यात आल्याने नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे. शहरातील कचराकुंड्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या असून, घंटागाडीतूनच कचरा गोळा करण्यात येत आहे.

कुर्डूवाडीची लोकसंख्या २२ हजार ४६३ असून, ४ हजार ६०० घरे आहेत. कचरा उचलण्यासाठी सहा घंटागाड्या, एक ट्रॅक्टर व एक डंपर आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत असून, रोज सरासरी चार टन ओला व दोन टन सुका कचरा असतो. 

या कंपोस्ट डेपोत ओल्या कचºयासाठी प्रत्येकी ३० टनाचे ७ कंपोस्ट पीट तयार करण्यात आले आहेत. यातील एक खड्डा भरण्यासाठी १० दिवस लागत असून, ४५ दिवसात कंपोस्ट खत तयार होते. प्रत्येक खड्ड्यावर बॅक्टरिया तयार होऊन त्यात बायोकल्चर टाकण्यात येते. यामुळे खत कुजण्याची प्रक्रिया लवकर होऊन दुर्गंधी येत नाही व त्यावर माशाही बसत नाहीत. ओल्या कचºयासाठी शेतकºयांतून मोठ्या प्रमाणावर मागणी असून, सुका कचरा प्रत्येक महिन्याला विकला जात आहे.

ओल्या कचºयापासून तयार झालेल्या कंपोस्ट खताची तपासणी पुणे विभागाच्या कृषी खात्याकडून करण्यात आली व त्यांनी हे खत शेतीसाठी उपयुक्त असल्याचा अहवाल दिला आहे. या कंपोस्ट खत डेपोवर शेतकºयांनी भेट देऊन खताची मागणी केली आहे. प्रत्येक टनासाठी आम्ही २०० रुपये असा दर ठरवला आहे.-कैलास गावडे, मुख्याधिकारी, कुर्डूवाडी

कुर्डूवाडी शहरातील सर्व कचराकुंड्या पालिकेने बंद केल्या आहेत. नागरिकांनी आपला कचरा विलगीकरण करुनच घंटागाडीला द्यावा. यापासून नगरपालिकेच्या वतीने त्या कचºयाचे कंपोस्ट खत बनविण्यात येईल व सुका कचरा अलग करणे सोयीस्कर होईल. खत विक्रीतून कुर्डूवाडी  नगरपालिकेचे उत्पन्न वाढेल.-समीर मुलाणी, नगराध्यक्ष, कुर्डूवाडी

टॅग्स :SolapurसोलापूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न