शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाला कंटाळून युवकाची आत्महत्या, नंदेश्वर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 12:47 IST

दुष्काळाचा बळी ; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देमंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखलसोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाने घेतला पहिला बळीपोलिसांचा तपास सुरू

नंदेश्वर : पडोळकरवाडी येथील किसन नामदेव लांडगे वय 35 या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 4 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आली असून याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना नंदेश्वर ता .मंगळवेढा येथे घडली आहे. 

याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की किसन नामदेव लांडगे हा 2 नोव्हेंबर रोजी नंदेश्वर ता. मंगळवेढा येथील आपल्या बहिणीकडे जाऊन येतो असे सांगून घरापासून आला होता. सतत दुष्काळामुळे तो ग्रासला होता. लांडगे यांचे कुटुंब शेतीत उत्पादन येत नसल्याने मोलमजुरी करून आपल्या पोटाची उपजीविका भागवीत होते. कायमच दुष्काळामुळे कंटाळला असल्याचे सतत तो बडबड करीत होता असे त्याचे वडील नामदेव लांडगे यांनी पोलीस फिर्यादीत म्हटले आहे. 4 नोव्हेंबर 2018 रोजी नंदेश्वर येथील महादेव दोलतडे यांच्या शेतालगत लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आल्यामुळे सदरची घटना येथील नातेवाईकांनी आत्महत्याग्रस्त किसन लांडगे यांच्या वडिलांना कळवली. त्यानंतर त्यांनी गावातील भावकीतील मंडळी यांना सोबत घेऊन नंदेश्वर येथे आले असता गळफास घेतल्याचे दिसून आले त्यांनी लागलीच याबाबतची फिर्याद मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोगडे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस