गोपाळपूरमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ चे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:36 IST2021-05-05T04:36:50+5:302021-05-05T04:36:50+5:30
प्रारंभी सरपंच विलास मस्के यांनी कोविड केअर सेंटरबद्दल प्राथमिक माहिती दिली. कोरोना महामारीच्या काळात उपचाराची सुविधा अल्पवेळेत उपलब्ध व्हावी, ...

गोपाळपूरमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ चे उद्घाटन
प्रारंभी सरपंच विलास मस्के यांनी कोविड केअर सेंटरबद्दल प्राथमिक माहिती दिली. कोरोना महामारीच्या काळात उपचाराची सुविधा अल्पवेळेत उपलब्ध व्हावी, गोपाळपूरचे नागरिक व रुग्णांची धावपळ होऊ नये म्हणून हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. नागरिकांनी अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर कुठेही फिरू नये, सतत मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी यावेळी केले.
सध्या पंचवीस बेड असून उपचाराची जबाबदारी डॉ. महेश गुरव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गोपाळपूरमधील रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गुरव, उपसरपंच विक्रम आसबे, ग्रा.पं. सदस्य उदय पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी जयकुमार दानोळे, तलाठी मुसाक काझी यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.