रस्ता क्रॉस करताना दुर्दैव आड आलं; दुचाकीनं उडवून जायबंदी केलं
By विलास जळकोटकर | Updated: July 3, 2023 17:44 IST2023-07-03T17:44:16+5:302023-07-03T17:44:21+5:30
जोराच्या धडकेने आकाश रस्त्यावर कोसळला. यात त्याच्या उजव्या हाताला, पायाला, कमरेला मुका मार लागला

रस्ता क्रॉस करताना दुर्दैव आड आलं; दुचाकीनं उडवून जायबंदी केलं
सोलापूर : रस्ता ओलांडत असताना अचानक पाठीमागून सुसाट आलेल्या दुचाकीनं धडक दिली आणि तरुण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बसवेश्वर तांड्याजवळ ही घटना घडली. आकाश शिवाजी बनसोडे (वय- ३०, रा. बसवेश्वर नगर, देगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
यातील जखमी आकाश हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडून रस्ता ओलांडत होता. अचानक पाठिमागून येणाऱ्या दुचाकीचा आवाज लक्षात येण्याअगोदरच धडक दिली. जोराच्या धडकेने आकाश रस्त्यावर कोसळला. यात त्याच्या उजव्या हाताला, पायाला, कमरेला मुका मार लागला. भाऊ उमेश याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. .