धक्कादायक! पडसाळीत ८० क्रेट टोमॅटोची चोरी; पोलीस तपासासाठी थेट शेतात

By Appasaheb.patil | Updated: August 9, 2023 16:04 IST2023-08-09T16:04:19+5:302023-08-09T16:04:39+5:30

सध्याच्या चालू बाजार भावाप्रमाणे २ लाख ७० हजाराची रुपये किंमतीच्या टोमॅटोची चोरी झाली असल्याचे धनाजी गजेंद्र भोसले व बालाजी गजेंद्र भोसले यांनी सांगितले

In Solapur, Theft of 80 crates of tomatoes in the fall; Directly to the farm for police investigation | धक्कादायक! पडसाळीत ८० क्रेट टोमॅटोची चोरी; पोलीस तपासासाठी थेट शेतात

धक्कादायक! पडसाळीत ८० क्रेट टोमॅटोची चोरी; पोलीस तपासासाठी थेट शेतात

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील २ लाख ७० हजार किंमतीच्या टोमॅटोची चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला. 

शेतकरी बालाजी गजेंद्र भोसले व धनाजी गजेंद्र भोसले या दोघाचा भावांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून असून त्यांनी आपल्या शेतातील सव्वा एकर शेतामध्ये इंडिम जातीच्या टमाट्याची लागवड केली होती. लागवडीसाठी दोन लाख रुपये खाजगी सावकाराकडून व्याजाने काढले  होते.

सध्या टोमॅटोला चांगला दर असून प्रति क्रेटला तीन हजार रुपये प्रमाणे विकला जातो, असे एकूण  ८० ते ९० कॅरेट टोमॅटोची चोरी झाली असून सध्याच्या चालू बाजार भावाप्रमाणे २ लाख ७० हजाराची रुपये किंमतीच्या टोमॅटोची चोरी झाली असल्याचे धनाजी गजेंद्र भोसले व बालाजी गजेंद्र भोसले यांनी सांगितले.  याबाबत भोसले यांनी पोलिसात तक्रार केली असता तात्काळ  प्रशासकीय पोलीस अधिकारी सत्यजित आवटे, ए.पी.आय, सुरज निंबाळकर, पी.एस.आय, शरद लोहारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

Web Title: In Solapur, Theft of 80 crates of tomatoes in the fall; Directly to the farm for police investigation