सोलापुरात घरगुती, व्यवसायिकांचा वीज वापर १६ मेगा वॅटने वाढला ,वाढत्या उन्हाचा परिणाम
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 23, 2023 19:27 IST2023-04-23T19:27:22+5:302023-04-23T19:27:32+5:30
महावितरण अधिका-यांना दिसून येत आहे. वीजेची बचत करुन बिलावर नियंत्रण आणता येते.

सोलापुरात घरगुती, व्यवसायिकांचा वीज वापर १६ मेगा वॅटने वाढला ,वाढत्या उन्हाचा परिणाम
सोलापूर : सूर्यनारायणाची तीव्रता वाढत गेल्याने सोलापूर शरात वीजेचा वापरही वाढला आहे. जानेवारी महिन्यात शहरात १२६.६१ मेगा वॅट वापरली गेली तर एप्रिल महिन्यात अर्ध्यातच १४२.२३ मेगा वॅट वीज वापरली गेली आहे. या महिन्यात आणखी वापर वाढणार असून याचा परिणाम ग्राहकांच्या बिलावरच होणार आहे.
शहरात पाच विभाग आहेत. या पाचही विभागात घरगुती आणि व्यापार वर्गाकडून वीज वापर पढलेला महावितरण अधिका-यांना दिसून येत आहे. वीजेची बचत करुन बिलावर नियंत्रण आणता येते.
मआयडीसीतील कारखान्यांना दर महिन्याला लागणारी वीज स्थीर आहे अर्थात त्यांना दर महिना लागणारी वीज ही निश्चीत आहे. तसेच कारखान्यांना सर्वाधीक अर्थात कमर्शीयल दराने वीज पुरवठा केला जात असल्याने याबाबत ते थोडेफार जागृत आहेत. मात्र इंडस्ट्रीयल एरिया वगळता इतर वर्गातून वीज वापर १६ मेगा वॅटने वाढला आहे.
सोलापुरात १० लाख ८९, ६६३ वीज जोडण्या...
घरगुती : ६ लाख २६ हजार ९४२
व्यापारी : ६३ हजार १०
औद्योगिक : २४ हजार १८५
कृषीपंप : ३ लाख ६९ हजार ८०८
सार्वजनिक दिवा बत्ती : ५ हजार ७१८
वीजेची बचत म्हणजे राष्ट्राची बचत आहे. कोणालाही वीज निर्मितीचा खर्च परवडणार नाही. उन्हाळ्यात वीज वापर वाढला असला तरी अनावश्यक वेळत वीज बचत कशी करता येईल यावर ग्राहकांनी विचार करावा. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात विजेचा वापर १६ मेगा वॅटने वाढलेला आहे.
- आशिष शर्मा
शहर अभियंता, महावितरण