शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

कामगाराला अडवून रोकड लुटली,  डोक्यात बिअरची बाटली फोडली

By विलास जळकोटकर | Published: January 08, 2024 5:04 PM

दोघांनी जखमी लक्ष्मणची दुचाकी अडवली. एकानं त्याच्या खिशात हात घालून १२०० रुपये रोकड काढून घेतली.

सोलापूर : एमआयडीसीतील काम आटोपून दुचाकीने साथीदारासोबत घराकडे जात असताना दोघांनी त्याला अडवून खिशातील रोकड हिसकावून घेतली. प्रतिकार करताना बिअरची बाटली डोक्यात, तोंडावर फोडून जखमी केले. गडगीनगरातील बिअर शॉपीजवळ ही घटना घडली.

लक्ष्मण अंबादास चिक्कलगी (रा. किसाननगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. यातील जखमी लक्ष्मण चिक्कलगी आणि त्याचा साथीदार रितेश ठवरे हे होघे एमआयडीसीत एका कारखान्यात कामास आहे. काम आटोपून दोघे एकाच दुचाकीवरून घराकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांची दुचाकी गडगी नगरातील लक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या राज बिअर शाॅपी समोरील रोडवरून पास होत होती.

दरम्यान, दोघांनी जखमी लक्ष्मणची दुचाकी अडवली. एकानं त्याच्या खिशात हात घालून १२०० रुपये रोकड काढून घेतली. प्रतिकार करताना एकानं हातातली बिअरची बाटली डोक्यात मारून जखमी केले. यात त्याच्या चेहऱ्यालाही जखम झाली. त्याच्यावर उपचार करण्यासाठी भाऊ रतिराज याने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.