मोठी बातमी! चालत्या बसने टेंभुर्णीजवळ घेतला पेट; १५ प्रवाशी सुखरूप 

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 10, 2025 12:02 IST2025-05-10T12:02:31+5:302025-05-10T12:02:49+5:30

फायर ब्रिगेड बोलाऊन सुमारे दीड तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले. यात जीवित हानी झालेली नसली तरी प्रवाशांचे डीकी मधील साहित्य जाळून खाक झाले.

In Solapur A moving bus caught fire near Tembhurni; 15 passengers safe | मोठी बातमी! चालत्या बसने टेंभुर्णीजवळ घेतला पेट; १५ प्रवाशी सुखरूप 

मोठी बातमी! चालत्या बसने टेंभुर्णीजवळ घेतला पेट; १५ प्रवाशी सुखरूप 

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील वेनेगाव हद्दीतील सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅस पंपासमोर आज शनिवार १० मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बेस्ट एक्सप्रेस नावाची लक्झरी बस नं. एन. एल. ०१ बी १८२४ ही हैदराबाद कडून मुंबईकडे जात असताना. चालू वाहनाने अचानक पेट घेतला.

बस चालक याने प्रसंगवधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सपोनी गिरीष जोग, हवालदार विशाल शिंदे यांनी तातडीने हजर राहून वाहनातील १५ पॅसेंजर सुखरूप खाली उतरवले. फायर ब्रिगेड बोलाऊन सुमारे दीड तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले. यात जीवित हानी झालेली नसली तरी प्रवाशांचे डीकी मधील साहित्य जाळून खाक झाले. सदर बस ड्राइव्हर अब्दुल इम्तियाज रा. मध्यपूर हैद्राबाद याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खबर दिली असून अगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सोलापूर पुणे महामार्गची वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली..

Web Title: In Solapur A moving bus caught fire near Tembhurni; 15 passengers safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.